औषधी वनस्पतींची लागवड साधना म्हणून करा !
औषधी वनस्पतींच्या भोवतालचे वातावरण जेवढे सात्त्विक असेल, तेवढ्या त्या अधिक सात्त्विक बनतात. जेवढा सत्त्वगुण जास्त, तेवढेच वनस्पतींमधील औषधी गुणही वाढतात. औषधी वनस्पतींची लागवड निवळ अर्थाजनाचे साधन म्हणून नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठीची साधना म्हणून केल्यास वनौषधी सात्त्विक होण्यास साहाय्य होते.