तुळशीचे महत्त्व आणि उपयुक्तता
तुळस धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून मानव जीवनासाठी सर्व प्रकारे कल्याणकारी आहे; म्हणून प्रत्येक सुसंस्कृत कुटुंबात तुळशीचे रोप अवश्य दिसून येते. पूर्वी प्रत्येक घरात तुळशीचे रोप असायचे.
तुळस धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून मानव जीवनासाठी सर्व प्रकारे कल्याणकारी आहे; म्हणून प्रत्येक सुसंस्कृत कुटुंबात तुळशीचे रोप अवश्य दिसून येते. पूर्वी प्रत्येक घरात तुळशीचे रोप असायचे.
‘गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांमधून चिनी कापराच्या वृक्षांविषयी वेगाने संदेश पसरत आहे. कापूर तसा सर्वांनाच परिचित आहे; परंतु ‘तो कुठून मिळतो ? कसा निर्माण होतो ?’ याविषयी अनेकांना ठाऊक नाही. ‘कापराचे झाड आजूबाजूच्या अर्धा किलोमीटर परिसरातील हवा शुद्ध करते’, अशी अशास्त्रीय माहिती सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून पसरवली जात आहे.
कोणत्या दिशेला कोणते झाड लावावे, घराजवळ कोणत्या वेली आणि झाडे लावावीत, कोणत्या दिशेला कोणती झाडे लावू नयेत, बाग अथवा वृक्षारोपण करण्यासाठीची शुभ नक्षत्रे इत्यादी विषयी माहिती.
लेखाच्या या भागात कुरडू आणि टाकळा या २ वनस्पतींची माहिती समजून घेऊया.
या लेखात दिलेल्या औषधी वनस्पतींपैकी काही वनस्पती आयुर्वेदाच्या औषधांच्या दुकानांत विकतही मिळतात; परंतु अशा वनस्पती विकत घेण्यापेक्षा त्या निसर्गातून गोळा करणे कधीही चांगले असते.
‘भावी भीषण संकटकाळामध्ये औषधांचा तुटवडा भासेल. त्यासाठी आतापासूनच औषधी वनस्पतींची लागवड करायला हवी. वनस्पतींची लागवड केल्यावर त्या वाढून वापरण्याजोग्या होईपर्यंत काही कालावधी जावा लागतो. घरगुती औषधे बनवून ती वापरणे शिकून घ्यावे लागते.
शास्त्रज्ञांनी बद्रीनाथ भागात आढळून येणार्या बद्री तुळशीवर संशोधन केले असता त्यांना या तुळशीत जलवायू परिवर्तनाशी लढण्याची अद्भुत क्षमता असल्याचे आढळून आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत औषधांचा प्रचंड तुटवडा भासू लागतो. अशा वेळी शासकीय यंत्रणांवर अवलंबून न रहाता औषधांच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी प्रत्येकाने आतापासूनच निदान स्वतःपुरत्या तरी काही औषधी वनस्पती लावायला हव्यात.
प्रत्येक राज्याचे शेतकीखाते, तसेच वनखाते यांमध्ये औषधी वनस्पती किंवा त्या वनस्पती कोठे मिळतात, यांविषयीची माहिती उपलब्ध असते. पुष्कळ आयुर्वेदीय महाविद्यालयांच्या रोपवाटिका असतात. स्थानिक आयुर्वेदीय महाविद्यालयांना संपर्क करूनही औषधी वनस्पती मिळवता येतील.