बहुउपयोगी अनंतमूळ !
अनंतमूळाची वेल १५ फूट लांबीची असते. त्याचे मूळ औषध म्हणून वापरतात. मराठीत याला ‘उपळसरी’ असेही म्हणतात.
अनंतमूळाची वेल १५ फूट लांबीची असते. त्याचे मूळ औषध म्हणून वापरतात. मराठीत याला ‘उपळसरी’ असेही म्हणतात.
लघवी होत नसल्यास : धने आणि गोखरू यांचा काढा तूप घालून द्यावा.
हृदरोग, दमा, खोकला यांवर पुष्करमूळाचे चूर्ण मधासमवेत घ्यावे बकुळीच्या फुलांचा हार घालावा, तसेच बकुळीच्या सालीचा काढा प्यावा.
आता जगामध्ये आयुर्वेदाला मोठ्या प्रमाणावर मान्यता मिळत असतांना भारतियांनीही डोळे उघडून आयुर्वेदाचा पुरस्कार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी अनेक रोगांवर उपयुक्त असणार्या काही वनस्पती किंवा फळे यांचे उपयोग येथे पाहूया.
मधुमेहासाठी उंबराच्या कोवळ्या पानांचा स्वरस मधासह द्यावा. त्यासमवेत जांभळाचे बी आणि शिलाजित द्यावे.
कफ, संधीवात, आमवात, सायटिका, डोकेदुखी, सूज, ताप, त्वचारोग – बचनाग पाण्यात उगाळून त्याचा लेप द्यावा.
उसाचा रस, आवळ्याचा रस किंवा कोहळ्याच्या रसासमवेत बाहव्याच्या शेंगेतील गर घ्यावा.
लहान मुला-मुलींच्या गळ्यात धागा बांधून त्याला छातीच्या पातळीवर येईल आणि शरिराला स्पर्श होईल, अशा प्रकारे वेखंडाचा तुकडा नीट घट्ट बांधून ठेवावा.