जेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा !
एक आहार पचल्यावरच दुसरा आहार घ्यावा, हा साधा, सोपा आणि सरळ नियम आहे. आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख !
एक आहार पचल्यावरच दुसरा आहार घ्यावा, हा साधा, सोपा आणि सरळ नियम आहे. आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख !
‘तांब्याच्या स्वच्छ भांड्यात २ घंट्यांपेक्षा (तासांपेक्षा) जास्त काळ ठेवलेल्या पाण्याला ‘ताम्रजल’ असे म्हणतात. ‘रसरत्नसमुच्चय’ हा आयुर्वेदातील रसशास्त्र या विषयावरील एक प्रमाणभूत संस्कृत ग्रंथ आहे. याच्या पाचव्या अध्यायातील ४६ व्या श्लोकात तांबे या धातूचे पुढील गुणधर्म दिलेले आहेत.
आजकाल खोबरेल तेलाविषयी अनेक अपसमज पसरलेले आहेत, उदा. खोबरेल तेल खाल्यास कॉलेस्टेरॉल वाढते. खरे तर, खोबरेल तेल प्रत्येकाने आपल्या समवेत ठेवल्यास दुस-या कोणत्याही औषधाची आवश्यकता भासणार नाही; मात्र हे तेल घाण्यावर काढलेले आणि कच्चे (न तापवलेले) असावे.
हिवाळ्यातील थंडीमुळे त्वचेवरील छिद्रे बंद होत असल्याने शरिरातील अग्नी आतल्या आत कोंडला जाऊन जठराग्नी प्रदीप्त होतो. शरिरातील रोगप्रतिकारक क्षमता आणि बळ अग्नीवर अवलंबून असल्याने तीसुद्धा या ऋतूत चांगली असतात; म्हणून हिवाळ्याचे अनुमाने ४ मास (महिने) निसर्गतःच आरोग्य उत्तम रहाते.
‘पावसाळा संपल्या संपल्या सूर्याचे प्रखर किरण धरणीवर पडू लागतात, तेव्हा शरद ऋतूला आरंभ होतो.शरद ऋतूमध्ये सर्वाधिक विकार होण्यास वाव असतो, म्हणूनच ‘वैद्यानां शारदी माता ।’ म्हणजे ‘(रुग्णांची संख्या वाढवणारा) शरद ऋतू वैद्यांची आईच आहे’, असे गमतीत म्हटले जाते.
पावसाळ्यापूर्वीच्या उन्हाळ्यामध्ये शरिरात कोरडेपणा आलेला असतो, शरिराची शक्ती न्यून झालेली असते. कडक उन्हानंतर वातावरणात अचानक पालट होऊन पावसामुळे गारठा निर्माण होतो.
संपूर्ण शरिराला अथवा शरिराच्या एखाद्या भागाला तेल लावून चोळणे याला ‘अभ्यंग’ (मालीश) असे म्हणतात. अभ्यंगामुळे शरिराचा थकवा आणि वात दूर होतो. रंग सुधारण्यास आणि कांती येण्यास साहाय्य होते.