‘कोरोना’चा वाढता संसर्ग लक्षात घेता ग्रीष्म ऋतूच्या पार्श्वभूमीवर आयुर्वेदाच्या दृष्टीने करण्याचे प्रतिबंधात्मक उपाय आणि पूर्वसिद्धता
सर्वांनीच प्रतिदिन दिवसातून ५ – ५ मिनिटे असे तीन वेळा दीर्घ श्वास घ्यावा. हा श्वास घेतांना अधिकाधिक हवा फुप्फुसांत ओढून घ्यावी. ही हवा शक्य तेवढा वेळ आत धरून ठेवावी. (म्हणजे कुंभक करावा.) आणि नंतर ती सावकाश सोडावी. असे केल्याने फुप्फुसांची क्षमता वाढते. कोरोनामध्ये फुप्फुसे घट्ट होण्याची शक्यता असते. असे केल्याने ती शक्यता अल्प होते.