आयुर्वेदानुसार महामारीची कारणे आणि उपाययोजना !
महामारी म्हणजे अनेक लोकांना तथा जनसमुदायाला मृत्यूमुखी पाडण्यासाठी गंभीर स्वरूप धारण केलेला आजार किंवा व्याधी. गावांत, जिल्ह्यांत, राज्यांत, देशात किंवा भूखंडात रहाणार्या सर्वच लोकांना अशा व्याधीस सामोरे जावे लागते. कोणताही आजार किंवा व्याधी यांच्या कारणांची विभागणी साधारण तथा असाधारण या दोन वर्गांत केली जाते.