लाकडी घाण्याचे आरोग्यदायी तेल !
लाकडी घाण्याचे तेल हे अत्यंत शुद्ध, रसायनेविरहित आणि आरोग्यास हितकारक असते, तसेच ते नैसर्गिक अन् शास्त्रोक्त पद्धतीने निर्माण केले जाते. त्याला शुद्ध तेलाचा वास येतो आणि ते चिकटही असते; कारण त्यामध्ये ४-५ प्रकारचे जीवनसत्त्वे असतात. लाकडी घाण्यात तेल काढतांना अत्यल्प घर्षण झाल्याने त्यातील एकही नैसर्गिक घटक नाश पावत नाही.