मनुष्याची विविध कुकर्मे आणि त्यानुसार त्याला होणार्‍या नरकयातना (श्रीमद्भागवत्)

शुकदेव गोस्वामी महाराज परिक्षिताला सांगतात, हे राजा, हे जग ३ प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे. सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. त्यामुळे त्यांना ३ वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम भोगावे लागतात. चांगली कृत्ये करून माणसे स्वर्गीय जीवनात आनंदी रहातात. वाईट कृत्यांमुळे आणि अज्ञानामुळे त्याला वेगवेगळ्या नरकयातना भोगाव्या लागतात.

कुटुंबातील व्यक्ती कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असतांना श्री. अतुल देव यांना नामजप आणि गुरुकृपा यासंदर्भात आलेल्या अनुभूती

‘साधकांमध्ये साधनेचे गांभीर्य टिकून रहावे, यासाठी संत सातत्याने जाणीव करून देत असतात. ‘काळ ‘आ’ वासून पुढे उभा आहे आणि प्रारब्धाचे डोंगर शिरावर आहेत’, या संतवचनाची प्रचीती कोरोना महामारीच्या रूपात आलेल्या आपत्काळात मला काही प्रमाणात अनुभवता आली. याविषयी मागील २ मासांच्या कालावधीत आलेले अनुभव येथे दिले आहेत.

यजमानांना ‘कोरोना विषाणू’चा संसर्ग झाल्यानंतर सौ. भक्ती भिसे यांना आलेले अनुभव आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

यजमानांना कोरोना झाला आहे’, हे सत्य स्वीकारता न आल्याने मनात पुष्कळ नकारात्मक विचार येऊन भीती आणि असुरक्षितता वाटणे. त्यानंतर पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी सांगतिले, ‘‘हा प्रारब्धाचा भाग अधिकाधिक नामजपादी उपाय कर अन् गुरुदेवांशी सूक्ष्मातून बोल.’’ अशा प्रकारे त्यांनी मला गुरुदेवांच्या सतत अनुसंधानात रहाण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी प्रयत्न केल्यावर २ दिवस माझ्या मनात भीतीचे विचार आले नाहीत.

जीवनातील नकारात्मकतेला दूर करा आणि सकारात्मक राहून आनंद मिळवा !

नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तीला व्यवहारातील सुख मिळत नाही आणि ती साधनेत आनंद मिळवू शकत नाही. या लेखात नकारात्मकतेची कारणे, नकारात्मकतेमुळे होणारे दुष्परिणाम, नकारात्मकता दूर करण्यासाठी करावयाचे उपाय इत्यादी दिले आहेत. हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.

नोकरी प्रामाणिकपणे आणि साधना केल्यामुळे देवाने साधकाला साहाय्य केल्याविषयी आलेली प्रचीती !

स्वेच्छा निवृत्ती घेतल्यावरही आस्थापनाच्या मालकाने साधकाला खर्च करण्यासाठी पैसे मिळावेत यासाठी त्यांना १० टक्के वेतन चालू ठेवणे. ‘साधना केल्यामुळे देव साधकांना कसे साहाय्य करतो ?’, याचे हे एक जिवंत उदाहरणच आहे.

‘दान’ या संकल्पनेविषयी पू. अनंत आठवले यांना साधिकेने विचारलेले प्रश्‍न आणि त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे

 ‘मी दान देत आहे’, अशी भावना देतांना मनात असली, तर ते ‘दान’ होईल. दानामध्ये तीन गोष्टी आल्या. ती वस्तू स्वतःची असल्याचे मानणे, म्हणजे ममत्व आले; दान देण्याचे कर्तृत्व, म्हणजे कर्तेपणा आला आणि ‘मी दान देतो’, हा अहंकार आला.

बोधप्रद प्रश्‍नोत्तरी

जन्म-मृत्यूच्या फे-यात अडकण्याचे मूळ कारण सांगून कधीही कोणतीही इच्छा (कामना) होतच नाही अशा स्थितीला पोहोचले, तर मोक्ष मिळेल.

पू. भगवंतकुमार मेनराय यांनी श्वासासह नामजप जोडता यावा, यासाठी केलेले मार्गदर्शन

साधकांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांना नामजप श्वासाशी जोडायचा आहे आणि श्वास नामजपाशी जोडायचा नाही, म्हणजे नामजपाच्या लयीत श्वासोच्छ्वास करायचा नाही, तर श्वासाच्या लयीत नामजप करायचा आहे.

सद्यःस्थितीत ‘कोरोना विषाणू’मुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अग्नीसंस्कार करता येत नसल्यास धर्मशास्त्रानुसार करावयाचा ‘पालाशविधी’ !

‘देशात सर्वत्र ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे आणि त्यामुळे अनेक जण मृत्यूमुखीही पडत आहेत. या संसर्गामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तिच्या कुटुंबियांना मृतदेह दिला जात नाही.

योगासने आणि प्राणायाम यांचा होणारा लाभ ते नामजपासहीत केल्याने अधिकच वाढतो !

२१ जून हा दिवस जगभर ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ‘योग’ या शब्दाचा उगम ‘युज’ या धातूपासून झाला आहे. ‘युज’ याचा अर्थ ‘संयोग होणे’ असा आहे. ‘योग’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘जीवात्म्याचे परमात्म्याशी मिलन होणे’ असा आहे. योगशास्त्राचा उगम सुमारे ५००० वर्षांपूर्वी भारतात झाला आहे….