‘भावजागृतीचे प्रयत्न’, ही परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवलेली प्रक्रियाच आपत्काळात जगण्यासाठीची संजीवनी !

‘प्रत्येकामध्ये देवाने असा एक उत्तम गुण दिलेला असतो की, त्याचा योग्य वापर केल्यास त्याची सेवा आणि साधना यांची फलनिष्पत्ती वाढते.

‘कोटी कोटी कृतज्ञता’ असे का म्हटले जाते ?

आपल्या प्रतिदिनच्या जगण्यातील, तसेच आयुष्यातील अनेक प्रसंग, घटना; किंबहुना प्रत्येकच गोष्टीविषयी कोटी कोटी म्हणजे अनंत कोटी वेळा कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती न्यूनच पडेल; म्हणून तर ‘कोटी कोटी कृतज्ञता’ असा शब्द वापरला जातो !

गुरु-शिष्य नात्यातील वीण घट्ट करणारा कृतज्ञताभाव !

माझ्यातील कर्तेपणा, अपेक्षा करणे, स्वतःला श्रेष्ठ समजणे इत्यादी अहंच्या पैलूंमुळे माझा देवाण-घेवाण हिशोब वाढत रहायचा. त्यामुळे मी भवसागरातील सुख-दुःखाच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात होतो. माझी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याशी भेट झाल्यावर हे गणित हळूहळू सुटू लागले. त्यांच्यामुळे मला ठाऊक नसलेल्या ‘कृतज्ञता’या शब्दातील भाव हळूहळू उलगडत गेले.

मुलुंड (मुंबई) येथे सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा स्थळाच्या प्रवेशद्वाराजवळ साधक बसलेल्या रिक्शावर झाड कोसळूनही साधक आणि रिक्शाचालक सुखरूप !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी कार्यरत असणार्‍या गुरुतत्त्वानेच सनातनच्या साधकांचे रक्षण केल्याचे दर्शवणारी घटना!

सर्वश्रेष्ठ नवविधा भक्ती !

भक्ती ही कृती नसून २४ घंटे असणारी वृत्ती आहे. नवविधा भक्ती आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाते. आत्मनिवेदन ही नवविधा भक्तीची सर्वोच्च पायरी आहे.

चारचाकी गाडीवर विजेचा खांब पडल्यावर झालेल्या अपघातात गुरुकृपेने कोणत्याही प्रकारची दुखापत न होणे

३१.१२.२०२१ या दिवशी चारचाकी गाडीने मी आणि ४ साधक नोएडाहून मथुरेला जात होतो. माझ्या चारचाकीच्या पुढे एक ट्रक (मालगाडी) होता. त्या ट्रकमध्ये अगदी वरपर्यंत सामान भरले होते. मार्गावरील विजेच्या तारा त्या सामानात अडकल्या आणि तो ट्रक त्या तारांना तसाच ओढत पुढे चालला होता.

साधकाच्या घरी असलेल्या देवघरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये झालेले पालट आणि आलेल्या अनुभूती

देवघरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला नमस्कार करतांना मला त्यांच्या छायाचित्रामध्ये पालट जाणवला. परात्पर गुरुदेवांच्या उजव्या गालावर चंदन किंवा अष्टगंध लावल्याप्रमाणे पट्टा स्पष्ट दिसत होता आणि हे छायाचित्र पुष्कळ मनोहारी दिसले. ‘ते पुन:पुन्हा पहात रहावे’, असे मला वाटले.

साधकांनो, ‘व्यष्टी साधनेचा आढावा देणे, ही आत्मनिवेदन भक्ती आहे’, हे जाणा आणि नियमितपणे आढावा देऊन साधनेची फलनिष्पत्ती वाढवा !

साधकांनी साधना करतांना उत्तरदायी साधकांना साधनेचा आढावा देण्याला पुष्कळ महत्त्व आहे. उत्तरदायी साधकांचे अनेक साधकांनी आढावा देण्याच्या संदर्भात लिहिलेले चिंतन वाचल्यानंतर लक्षात आले, ‘बहुतांश साधक साधनेचा आढावा देण्याच्या संदर्भात न्यून पडत आहेत.