केवळ महर्षींच्या कृपेने भ्रमणभाषद्वारे चेन्नईत संपर्क होणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधकांवर लक्ष आहे’, हा साधकांना आश्वस्त करणारा निरोप देता येणे
‘१२.१२.२०१६ या दिवशी ताशी १२० किलोमीटर वेगाने वहाणारे ‘वरदा’ हे चक्रीवादळ चेन्नई किनारपट्टीवर धडकले. या आपत्काळात चेन्नई येथील साधकांनी देवाची कृपा अनुभवली. संत आणि महर्षि यांच्या सांगण्यानुसार पुढील काळात अशा प्रकारच्या अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे.