कर्मकांडाविषयी शंकानिरसन
कर्मकांड हा साधनेतील प्राथमिक परंतु अविभाज्य असा भाग आहे. कर्मकांडात पाळावयाचे विविध नियम, आचरण कसे असावे याविषयी बहुतेकांना माहिती असते; परंतु त्यामागील कारण अन् शास्त्र यांविषयी आपण अनभिज्ञ असतो. प्रत्येक कृतीमागील शास्त्र लक्षात आल्यास देवावरील श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते.