‘दान’ या संकल्पनेविषयी पू. अनंत आठवले यांना साधिकेने विचारलेले प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे
‘मी दान देत आहे’, अशी भावना देतांना मनात असली, तर ते ‘दान’ होईल. दानामध्ये तीन गोष्टी आल्या. ती वस्तू स्वतःची असल्याचे मानणे, म्हणजे ममत्व आले; दान देण्याचे कर्तृत्व, म्हणजे कर्तेपणा आला आणि ‘मी दान देतो’, हा अहंकार आला.