स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया हाच मानसिक आरोग्यासाठी रामबाण उपाय !
सनातन संस्था सांगत असलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवूनच मनाच्या सैरभैरतेला आळा घालणे शक्य !
सनातन संस्था सांगत असलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवूनच मनाच्या सैरभैरतेला आळा घालणे शक्य !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संशोधन करून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शोधून काढली आहे. यापूर्वी अनेक मनोरुग्णांना याचा लाभ झाला आहे. तसेच सनातनचे सहस्रो साधक या प्रक्रियेचा अनन्यसाधारण लाभ अनुभवत आहेत.
मन अस्थिर होणे, मनावर ताण येणे, काळजी वाटणे, भीती वाटणे, परिस्थिती स्वीकारता न येणे इत्यादी त्रास होतात. बर्याच जणांना नातेवाइकांतही भावनिकदृष्ट्या अडकायला होते. असे झाल्यास मानसोपचारतज्ञाचे साहाय्य घ्यावे.
आपत्काळातील पूर, भूकंप, दंगल, महायुद्ध इत्यादी आपत्तींच्या वेळी भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मनोबल निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वयंसूचना-उपचारपद्धती’चा वापर करावा. त्यामुळे मनावरील ताण दूर होईल !
नकारात्मक विचार करणार्या व्यक्तीला व्यवहारातील सुख मिळत नाही आणि ती साधनेत आनंद मिळवू शकत नाही. या लेखात नकारात्मकतेची कारणे, नकारात्मकतेमुळे होणारे दुष्परिणाम, नकारात्मकता दूर करण्यासाठी करावयाचे उपाय इत्यादी दिले आहेत. हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.
‘लहानसहान कारणांनी मन विचलित होणे, काळजी वाटणे, तसेच भीती वाटून अस्वस्थता येणे’, अशा प्रकारे स्वभावदोषांचे प्रकरटीकण होण्याची शक्यता असते. त्या प्रसंगी योग्य त्या स्वयंसूचना दिल्यास प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यास साहाय्य होते.
साधकात अनेक तीव्र स्वभावदोष असूनही त्याच्यात भाव, प्रीती, ईश्वरप्राप्तीची तळमळ इत्यादी आध्यात्मिक गुण असले, तर त्याची साधनेत प्रगती होते.
स्वभावदोष आणि अहं हे ईश्वरप्राप्तीसाठीच्या साधनेतील दोन मोठे अडथळे आहेत. स्वभावदोष आणि अहं असला, तर वैयक्तिक जीवनही दुःखी होते आणि व्यक्तीमत्त्वाचा विकासही खुंटतो.
स्वभावदोष-निर्र्मूलन प्रक्रियेमुळे दोषांवर नियंत्रण येऊन स्वतःमध्ये गुणांचा विकास होतो; म्हणून जीवन सुखी अन् आदर्श बनते.
स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेत स्वयंसूचना तयार करणे व स्वयंसूचनेची अभ्याससत्रे करणे, हे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. यांपैकी एका टप्प्यात जरी चूक झाली, तरी प्रक्रियेचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. त्यामुळे प्रक्रिया अमलात आणूनही माझ्यातील स्वभावदोष का दूर होत नाहीत, असे वाटून नैराश्य येऊ शकते. असे होऊ नये, यासाठी स्वयंसूचनेच्या संदर्भात पुढील चुका टाळाव्यात. १. स्वयंसूचना देणे टाळून वृत्तीच्या स्तराऐवजी केवळ … Read more