अपघातांपासून रक्षण होण्‍यासाठी प्रतिदिन नामजपादी उपाय करा !

‘सनातनचे राष्‍ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य जसजसे वाढत आहे, तसतसे या कार्यात अडथळे आणण्‍यासाठी वाईट शक्‍ती मोठ्या प्रमाणात कार्यरत झाल्‍या आहेत. साधकांनी मात्र वाईट शक्‍तींच्‍या आक्रमणांपासून रक्षण होण्‍यासाठी साधना आणि आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय वाढवणे अत्‍यावश्‍यक आहे.

‘डिसीझ एक्‍स’ या घातक अशा संभाव्‍य महामारीवर करावयाचा नामजप

‘जागतिक आरोग्‍य संघटने’ने दावा केला आहे की, जगभरात ‘कोरोना’ महामारीपेक्षाही ७ पटींनी अधिक घातक अशी ‘डिसीझ एक्‍स’ नावाची महामारी येणार आहे. त्‍यामुळे जगातील ५ कोटी लोकांचा जीव जाऊ शकतो. ही महामारी जगावर केव्‍हाही घाला घालू शकते.

जागतिक महामारी पसरवणार्‍या ‘कोरोना विषाणूं’नंतर आता आलेल्या ‘ओमिक्रॉन विषाणूं’शी आध्यात्मिक स्तरावर लढण्यासाठी हा नामजप करा !

‘वर्ष २०२० पासून जगभरातील लोकांवर ‘कोरोना विषाणूं’चे संकट आहे आणि २ वर्षे होत आली तरी अजूनही त्या विषाणूंची लागण लोकांना होतच आहे. त्यात आता ‘ओमिक्रॉन’ नावाचा नवीन विषाणू पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी देवाने सुचवलेला नामजप !

कोरोना विषाणूंविरुद्ध स्वतःत प्रतिकारक्षमता निर्माण होण्यासाठी वैद्यकीय सल्ला आणि उपचार यांसमवेत आध्यात्मिक बळ वाढावे, म्हणून देवाने सुचवलेल्या या ३ देवतातत्त्वांच्या प्रमाणानुसार पुढील नामजप सिद्ध झाला

काही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – ३

१. झोपेशी संबंधित विकार १ अ. . झोप न लागणे (निद्रानाश) १. श्री हनुमते नमः । (वायु), नामजप एेका २. श्री दुर्गादेव्यै नमः । (तेज), नामजप एेका ३. श्री दुर्गादेव्यै नमः। – श्री गुरुदेव दत्त । (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज; देवता : दत्त, तत्त्व : पृथ्वी, आप), ४. भर्गो (तेज), ५. ई (देवता : श्रीराम, तत्त्व : आप), ६. … Read more

काही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – २

अस्थी आणि स्नायू संस्थेचे विकार, स्नायूंचे विकार, पाठीचा कणा, मणक्यांचे सांधे आणि पाठीचे स्नायू यांचे विकार निर्मूलनासाठी नामजप जाणून घ्या !

काही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – १

प्रत्येक देवतेची विशिष्ट कंपने असतात. त्या देवतेच्या नावाचा जप केल्याने जी विशिष्ट कंपने शरिरात निर्माण होतात, त्यांच्यामुळे विकाराद्वारे शरिरात निर्माण झालेली अनैसर्गिक किंवा प्रमाणबाह्य कंपने सुधारण्यास साहाय्य होते, म्हणजेच विकार-निर्मूलन होण्यास साहाय्य होते.

विकार-निर्मूलनासाठी नामजप कसा निवडावा ?

मनुष्याच्या बहुतेक शारीरिक आणि मानसिक विकारांमागील मूळ कारण आध्यात्मिक असते. हे कारण नष्ट होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय योजावा लागतो. नामजप हा एक उत्तम आध्यात्मिक उपाय आहे.

नामजप : व्याधींवरील उपाय

प्रस्तूत लेखात आपण नामजपाचे अध्यात्मशास्त्रदृष्ट्या लाभ काय आहेत हे पाहूया. मनुष्याच्या इंद्रियांचे कार्य आध्यात्मिक कारणामुळे बिघडले असल्यास त्यावर उपाय म्हणून नामजप करू शकतो.