नियमितपणे प्राणायाम, व्यायाम आणि योगासने करून शरिराची प्रतिकारक्षमता वाढवा !
व्यावहारिकदृष्ट्या जसे अर्थार्जनासाठी देह झिजवणे आवश्यक आहे, तसे आपला देह चालण्यासाठी त्यामध्ये योग्य प्रमाणात प्राणशक्ती (चेतनाशक्ती) प्रवाहित होणे आणि तिचे नियमन होणे अत्यावश्यक आहे. यासाठी संतुलित आहाराचे सेवन, योग्य दिनचर्येचे पालन आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक असते.