सनातनचे ग्रंथप्रदर्शन शाळा आणि महाविद्यालये येथे लावले पाहिजे ! – स्वामी रामरसिकदास महाराज, अयोध्या

सर्व नागरिक आणि मुले यांना आध्यात्मिक ग्रंथांची माहिती होण्यासाठी सनातनचे ग्रंथप्रदर्शन अतिशय शिक्षणप्रद अन् बोधप्रद आहे. हे प्रदर्शन शाळा आणि महाविद्यालये येथे अवश्य लावले पाहिजे, असे प्रतिपादन स्वामी रामरसिकदास महाराज यांनी काढले.

धर्मापासून दूर गेलेल्या तरुण पिढीला धर्माच्या मार्गावर आणण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे ! – शनि महाराज, सातारा

सनातनचे कार्य हिंदु राष्ट्र निर्माण करण्याचे आहे. यामुळे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे. जिहादी लोक आपल्या मुलींना पळवून नेत आहेत, त्यांना प्रतिबंध करण्याचे काम सनातन करत आहे.

काश्मीरप्रमाणे देशात ‘इस्लामिक स्टेट’ येण्यापूर्वी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – चेतन राजहंस

वर्ष १९९० मध्ये काश्मीर खोर्‍यामध्ये ‘रलिव्ह’, ‘चलिव्ह’ आणि ‘गलिव्ह’, अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. याचा अर्थ ‘इस्लाम स्वीकारा, काश्मीर सोडा अथवा मृत्यूला सामोरे जा’, असा होतो.

सनातन संस्थेचे कार्य उत्कृष्ट आहे ! – श्री रमेशगिरी महाराज, जनार्दन आश्रम, कोपरगाव

सनातन संस्थेचे कार्य उत्कृष्ट आहे, हे प्रदर्शन पाहिल्यानंतर लक्षात येते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदूंमध्ये जागृती होईल, अशी मी अपेक्षा करतो, असे प्रतिपादन कोपरगाव (महाराष्ट्र) येथील जनार्दन आश्रमाचे श्री रमेशगिरी महाराज यांनी केले.

मोक्षप्राप्ती करण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

 धर्माने सांगितलेल्या चार पुरुषार्थांपैकी ‘मोक्ष’ या पुरुषार्थाची प्राप्ती करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी येथे केले.

धर्मशिक्षण प्रदर्शनातून हिंदु धर्माचे संवर्धन होण्यास साहाय्य होणार आहे ! – महामंडलेश्‍वर श्री गणेशानंदगिरी महाराज

धर्मशिक्षण प्रदर्शनातून हिंदु धर्माचे संवर्धन होण्यास साहाय्य होणार आहे, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्‍वर येथील महामंडलेश्‍वर श्री गणेशानंदगिरी महाराज यांनी ३० जानेवारी या दिवशी येथे केले.

सनातनचे ग्रंथप्रदर्शन सर्वत्र लावल्यास देशात धर्माचा अधिक प्रचार होईल ! – श्री स्वामी सत्यप्रसाददासजी महाराज, श्री स्वामीनारायण संप्रदाय, गुजरात

श्री स्वामी सत्यप्रसाददासजी महाराज हे श्री रामानुज वैष्णव परंपरेतील श्री स्वामी नारायण संप्रदायाचे आहेत. १ फेब्रुवारी या दिवशी कुंभनगरीतील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ अन् धर्मशिक्षण प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली.

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातील सर्व विषय सरकारने पाठ्यपुस्तकांत घेणे आवश्यक आहे ! – आर्य शेखर, गंगा नदी प्रदूषण मुक्तीचे आंदोलक

सनातनचे प्रदर्शन पहाण्याचे मला भाग्य लाभले. पुढील पिढीला देण्यासाठी या प्रदर्शनातून बरेच काही घेता येईल. भावी पिढीला पाठ्यपुस्तकांतून या प्रदर्शनातील विषय शिकवले पाहिजेत, असे प्रतिपादन समाजसेवक आणि गंगा नदी प्रदूषण मुक्तीचे आंदोलक श्री. आर्य शेखर यांनी केले.

सनातन धर्मातील सर्व पंथांनी भेदभाव सोडून कार्य केल्यास यश निश्‍चित मिळेल ! – महामंडलेश्‍वर श्री स्वामी गिरिधरगिरी महाराज, हरिद्वार, उत्तराखंड

आपण सर्व कार्य करत असतांना सर्वजण बरोबरीचे अधिकारी आहोत. येथे कोणी लहान-मोठा असत नाही, असे प्रतिपादन हरिद्वार येथील श्रीकृष्ण निवास तथा पूर्णानंद आश्रमाचे महामंडलेश्वर श्री स्वामी गिरिधरगिरी महाराज (छोटे महाराज) यांनी ३१ जानेवारी या दिवशी येथे केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याप्रमाणे सर्व संतांनी कार्य करायला हवे ! – स्वामी भास्करतीर्थ महाराज, महामंत्री, अखिल भारतीय संत समिती, ओडिशा

माता गंगा नदीच्या किनारी हिंदूंचे रक्षण आणि जागृती यांसाठी हे प्रदर्शन लावले आहे. अनेक संकटे आली, तरी तुम्ही हिंदु धर्माची परंपरा आणि हिंदू यांच्यासाठी कार्य करत आहात. सर्व संतांनी असे कार्य करायला हवे. सध्या भारतात आदिवासी भागांतील आणि इतर ठिकाणचे हिंदू हे ख्रिस्ती होत आहेत.