ज्ञानयोगी आणि ऋषितुल्य परात्पर गुरु परशराम पांडे महाराज (वय ९२ वर्षे) यांचा देहत्याग !
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साक्षात प्रतिरूप असलेले ज्ञानयोगी अन् ऋषितुल्य परात्पर गुरु पांडे महाराज (वय ९२ वर्षे) यांनी रविवार, माघ कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५१२० (म्हणजेच ३ मार्च २०१९) या दिवशी सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला.