निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी संतपदी विराजमान

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी न्यायालयीन संघर्षाचे योद्धे आणि कर्मयोग अन् भक्तीयोग यांचा अपूर्व संगम असलेले निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर हे सनातनच्या ९७ व्या व्यष्टी संतपदी, तर अधिवक्ता सुरेश कुलकर्णी हे सनातनच्या ९८ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले आहेत, अशी आनंददायी घोषणा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केली.

बांगलादेशातील हिंदूंसाठी प्राणपणाने लढणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अधिवक्ता रवींद्र घोष संतपदी विराजमान !

स्वत:वर अनेक प्राणघातक आक्रमणे होऊनही त्याची पर्वा न करता इस्लामी देश असलेल्या बांगलादेशातील हिंदूंसाठी प्राणपणाने लढणारे, त्यांचे आधारस्तंभ असलेले आणि बांगलादेशचे स्वातंत्र्यसैनिक ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अधिवक्ता रवींद्र घोष (वय ६७ वर्षे) त्यांच्या निष्काम कार्यामुळे संतपदावर विराजमान झाले आहेत…

राममंदिर उभारण्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याची सिद्धता असलेले कर्मयोगी अधिवक्ता हरि शंकर जैन संतपदी विराजमान !

धर्मरक्षणाची तीव्र तळमळ, निष्काम भावाने सेवारत रहाण्याची वृत्ती, उत्साहाचा अक्षय स्त्रोत आणि ध्यानी-मनी-स्वप्नी केवळ रामराज्याचा, म्हणजे हिंदु राष्ट्राचा ध्यास आदी विविध गुणांचा समुच्चय म्हणजे देहली येथील ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’ या संघटनेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अधिवक्ता हरि शंकर जैन !

बेंगळुरु (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

शांत आणि नम्र स्वभाव असलेले, प्रामाणिक वृत्तीचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तळमळ असलेले बेंगळुरु (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले.

आपत्काळाचे भीषण स्वरूप

सध्या संपूर्ण विश्वात, तसेच भारतातही आपत्काळाने महाभयंकर रूप धारण केले आहे. अनेक द्रष्ट्या संतांनीही ‘भावी काळ हा केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण विश्वासाठी भीषण आहे’, असे सांगितले आहे.

तन, मन आणि धन अर्पून गुरुसेवा करणारे अन् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा ध्यास असलेले डिगस (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील बन्सीधर तावडे सनातनच्या ९३ व्या संतपदी विराजमान !

‘वैशाख पौर्णिमेला, म्हणजे १८ मे २०१९ या दिवशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित सत्संग सोहळ्यात सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी डिगस (तालुका कुडाळ) येथील श्री. बन्सीधर तावडे (वय ७९ वर्षे) हे सनातनच्या ९३ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्री सत्यनारायण पूजा

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत आणि सनातनच्या साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी मयन महर्षींच्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात चैत्र पौर्णिमेला, म्हणजे हनुमान जयंतीला (१९ एप्रिल या दिवशी) श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली.

कारवार (कर्नाटक) येथील श्रीमती शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) संतपदी विराजमान !

कारवार येथील एका सत्संगसोहळ्यात पू. माईणकरआजी ८६ व्या संत झाल्याचे सनातनचे कर्नाटक राज्य धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांनी घोषित केले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्रीरामनवमीचा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

 ‘चैत्र मास त्यात शुद्ध नवमी’ ही तिथी म्हणजेच विश्वाला सर्वार्थाने आदर्श असलेल्या श्रीरामाचा जन्मदिन ! या मंगलदिनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला.

किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबा यांचे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन !

किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबा आणि त्यांच्या पत्नी सौ. ज्योती राव यांचे ३० मार्च या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले.