हिंदूंनो, ‘गोग्रास’ गायीलाच देताय ना ?
हिंदु धर्मात ‘गोग्रास’ पुण्यप्रद मानला जातो. सणासुदीला गोग्रास दिल्याविना भोजन न करणारे हिंदू आहेत, तसेच नियमित गोग्रास दिल्याविना भोजन ग्रहण न करणारे हिंदूही आज आहेत; मात्र हा ग्रास गायीलाच भरवला जात आहे ना, हे मात्र पहाण्याची आवश्यकता आहे.