रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात संतांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडला ‘सुदर्शन महायाग’ !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा’, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात २४ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत भावपूर्ण वातावरणात ‘सुदर्शन महायाग’ करण्यात आला.

सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचा साधनाप्रवास उलगडणार्‍या चरित्र ग्रंथाचे भावपूर्ण वातावरणात प्रकाशन

मुलुंड येथील मुलुंड सेवासंघात २१ ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेल्या भावसोहळ्यात ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन अन् साधनाप्रवास’ (साधनेतील अंतर्मुखता व प्रगती यांसाठी केलेल्या प्रयत्नांसह) या चरित्र ग्रंथाच्या खंड १ चे प्रकाशन करण्यात आले.

रामनाथी आश्रमात स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबाजी यांनी केले मृत्यूंजय याग, उग्रप्रत्यंगिरा याग आणि नवग्रह याग !

मंगळुरू (कर्नाटक) येथील स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबाजी यांनी येथील सनातनच्या आश्रमात मृत्यूंजय याग, उग्रप्रत्यंगिरा याग आणि नवग्रह याग केले.

ज्येष्ठ समर्थभक्त पू. मारुतिबुवा रामदासी (भोसले) यांचा देहत्याग

श्रीक्षेत्र सज्जनगड येथील ज्येष्ठ समर्थभक्त पू. मारुतिबुवा रामदासी (भोसले) (वय ८४ वर्षे) यांनी १९ ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजता समर्थसदन येथे देहत्याग केला.

गणेशोत्सव आणि पितृपक्ष यांसंबंधी धर्मशिक्षण देणारे दृकश्राव्य माहितीपट विविध ठिकाणी प्रसारित !

सनातन संस्थेच्या वतीने गणेशोत्सव आणि पितृपक्ष यांसंबंधी धर्मशिक्षण देणारे दृकश्राव्य माहितीपट विविध ठिकाणी प्रसारित करण्यात आले.

धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झाला ‘गरूड पंचाक्षरी याग’ !

हिंदु राष्ट्र-स्थापनेतील विविध अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि साधकांना विविध कारणांमुळे होणारे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यांसाठी ११ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात ‘गरूड पंचाक्षरी याग’ करण्यात आला.

‘समाजात सनातनची मानहानी व्हावी’, या उद्देशाने सनातनच्या नावाखाली कोणी अपकृत्ये करत असल्याचे लक्षात आल्यास त्याविषयी त्वरित कळवून सहकार्य करा !

‘सनातनच्या नावाखाली समाजामध्ये खंडणी गोळा करणे, खोटी पावतीपुस्तके छापून त्याद्वारे अर्पण गोळा करणे, सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने अधिक किमतीला विकणे, यांसारखी दुष्कृत्ये काही समाजकंटक करत असल्याचे लक्षात आले आहे.

नवरात्रोत्सवाच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री काळभैरवपूजन, महाचंडी याग आणि श्री बगलामुखी याग !

नवरात्रीतील अष्टमी आणि नवमी या २ तिथींच्या दिवशी महाचंडीयाग झाला. या वेळी श्री दुर्गादेवीचे षोडशोपचार पूजन, कुंकूमार्चन, तसेच सप्तशतीच्या १३ अध्यायांचे पठण करत आहुती देण्यात आल्या.