कालमहिम्यानुसार समष्टी साधनेला ७० टक्के, तर व्यष्टी साधनेला ३० टक्के महत्त्व ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात १ नोव्हेंबरपासून ‘युवा साधना शिबिरा’ला आरंभ झाला.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या चैतन्यमय वातावरणात झाला पंचमहाभूत याग

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, पंचमहाभूतांच्या प्रकोपांपासून साधकांचे रक्षण व्हावे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सूक्ष्मातील अडथळे दूर व्हावेत’, यांसाठी पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांच्या आज्ञेने १८ ऑक्टोबर २०१९ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात ‘पंचमहाभूत याग’ करण्यात आला.

दीपावलीच्या मंगलदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात भावपूर्ण वातावरणात झाले श्री लक्ष्मी-कुबेर पूजन !

दीपावलीच्या मंगलदिनी म्हणजे २७ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री लक्ष्मी-कुबेर यांचे पूजन केले.

प.पू. देवबाबा यांच्या हस्ते कन्नड भाषेतील अँड्रॉईड ‘सनातन पंचांग २०२०’चे प्रकाशन

किन्नीगोळी येथे असलेल्या ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’चे प.पू. देवबाबा यांच्या हस्ते २६ ऑक्टोबर या दिवशी कन्नड भाषेतील ‘अँड्रॉईड सनातन पंचांग २०२०’चे प्रकाशन करण्यात आले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात संतांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडला ‘सुदर्शन महायाग’ !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा’, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात २४ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत भावपूर्ण वातावरणात ‘सुदर्शन महायाग’ करण्यात आला.

सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचा साधनाप्रवास उलगडणार्‍या चरित्र ग्रंथाचे भावपूर्ण वातावरणात प्रकाशन

मुलुंड येथील मुलुंड सेवासंघात २१ ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेल्या भावसोहळ्यात ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन अन् साधनाप्रवास’ (साधनेतील अंतर्मुखता व प्रगती यांसाठी केलेल्या प्रयत्नांसह) या चरित्र ग्रंथाच्या खंड १ चे प्रकाशन करण्यात आले.

रामनाथी आश्रमात स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबाजी यांनी केले मृत्यूंजय याग, उग्रप्रत्यंगिरा याग आणि नवग्रह याग !

मंगळुरू (कर्नाटक) येथील स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबाजी यांनी येथील सनातनच्या आश्रमात मृत्यूंजय याग, उग्रप्रत्यंगिरा याग आणि नवग्रह याग केले.

ज्येष्ठ समर्थभक्त पू. मारुतिबुवा रामदासी (भोसले) यांचा देहत्याग

श्रीक्षेत्र सज्जनगड येथील ज्येष्ठ समर्थभक्त पू. मारुतिबुवा रामदासी (भोसले) (वय ८४ वर्षे) यांनी १९ ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजता समर्थसदन येथे देहत्याग केला.