‘सनातन डॉट ऑर्ग’या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसार कार्य !

सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देणा-या वाचकांच्या व्यतिरिक्त सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून संस्थेशी जोडल्या गेलेल्या वाचकांचाही एक वेगळा वर्ग असल्याने त्या संदर्भातील माहितीही आम्ही प्रसिद्ध करत आहोत.

सनातनच्या आश्रमांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी विविध उपकरणांची आवश्यकता

‘सनातनच्या आश्रमांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे शेकडो साधक राहतात. त्यांपैकी काही जणांना हृदयविकार, मधुमेह, संधीवात आदी शारीरिक व्याधी आहेत. असे रुग्ण आणि वृद्ध यांसाठी आश्रमात पुढील उपकरणांची आवश्यकता आहे.

शालेय शिक्षणामध्ये मानसिक आरोग्याला महत्त्व द्यावे

‘बी द चेंज’ या पहिल्या मानसिक आरोग्य परिषदेत पालक-शिक्षक, मानसोपचारतज्ञ सहभागी झाले होते. ‘बौद्धिक विकासापेक्षा मुलांच्या भावनिक विकासाला अधिक महत्त्व दिले पाहिजे’, असे आदित्य बिर्ला शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका सिन्हा म्हणाल्या.

हिमनग अतीवेगाने वितळू लागल्याने येत्या काही वर्षांत पृथ्वीवर भयावह संकट येणार

अंटार्टिकामधील सर्वांत जुना आणि स्थिर मानला जाणारा, तसेच ‘द लास्ट आइस एरिया’ नावाने ओळखला जाणारा हिमनग अतीवेगाने वितळू लागला आहे.

मंदिरांची भूमी देवांच्याच अधिकारात राहील ! – मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई येथील मद्रास उच्च न्यायालयाने एका खटल्याचा निकाल देतांना ‘तमिळनाडूमधील सहस्रो कोटी रुपयांचा मंदिरांचा भूखंड देवांच्या अधिकाराखाली राहील’, असा निर्णय दिला आहे.

‘ऑनलाइन’ खरेदी करण्याची सवय हा एकप्रकारचा मानसिक आजार ! – संशोधन

जर्मनीच्या हॅनोवर मेडिकल स्कूलच्या वैज्ञानिकांनी केलेल्या एका संशोधनानुसार ऑनलाइन खरेदीची सवय हा एकप्रकारचा मानसिक आजार आहे.

हवामान पालटाचा भारतीय बालकांना आजीवन धोका ! – ‘लॅन्सेट’ विज्ञानपत्रिकेतील अहवाल

जागतिक तापमानवाढीमुळे हवामानात होत असलेल्या पालटांचा सर्वाधिक फटका जगभरातील, विशेषत: भारतीय बालकांना अधिक प्रमाणात बसेल.

हासन (कर्नाटक) येथील गुरुजी मुरलीकुमार यांची रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

गुरुजी मुरलीकुमार यांनी वास्तुशास्त्र या विषयात पीएच्.डी. केली आहे. आंध्रप्रदेश येथील त्यांचे गुरु डॉ. ब्रह्माजी यांच्या आज्ञेनुसार गेल्या २२ वर्षांपासून ते लोककल्याणासाठी, अभिवृद्धीसाठी समाजसेवेच्या दृष्टीने विनामूल्य कार्यरत आहेत.

सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले अयोध्येतील रामललाचे दर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संकल्पाला प्रभु श्रीरामाचे आशीर्वाद लाभावेत, यासाठी सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी येथील रामललाचे दर्शन घेतले.

जळगावचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार सुरेश भोळे यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सदिच्छा भेट

जळगाव येथील भाजपचे नवनिर्वाचित आमदार श्री. सुरेश भोळे यांची पद्मालय विश्रामगृह येथे भेट घेऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.