देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात श्री दत्ताच्या पालखीचे भावपूर्ण आणि उत्साहात स्वागत

दत्तजयंतीच्या निमित्ताने येथील श्री शिवगिरी सेवा संस्थेच्या वतीने उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात काढलेल्या श्री दत्त पालखीचे येथील सनातनच्या आश्रमात ११ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता आगमन झाले.

भृगु महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पार पडला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘श्रीविष्णुतत्त्व जागृती सोहळा’ !

भगवान श्री महाविष्णु हा विश्वपालक आहे. त्याच्याच कृपेने हे विश्व नियंत्रित होते. सध्या युगांचा संधीकाळ चालू आहे

जंतूंच्या संसर्गापासून वाचण्यासाठी देहलीतील ‘एम्स’मधील डॉक्टरांकडून हस्तांदोलनाऐवजी ‘नमस्कार’ करण्याचा उपक्रम !

नवी देहली येथील एम्स रुग्णालयामध्ये जंतूंच्या संसर्गापासून वाचण्यासाठी ‘नमस्कार’ करण्याचा उपक्रम चालू करण्यात आला आहे.

‘दैनिक लोकसत्ता’ने ‘सनातन संस्थेवरील बंदीची मागणी योग्य कि अयोग्य’ या घेतलेल्या मतचाचणीमध्ये नागरिकांचा कौल सनातन संस्थेच्या बाजूने !

मतचाचणीमध्ये ४१ टक्के नागरिकांनी सनातनवर बंदी घालण्याची मागणी योग्य असल्याचे,  तर ५९ टक्के नागरिकांनी सनातन संथेवरील बंदीची मागणी योग्य नसल्याचे मत नोंदवले आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला महारुद्रयाग

कर्नाटक येथील विनयगुरुजी यांच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमात २५ नोव्हेंबर २०१९ या दिवशी महारुद्रयाग भावपूर्ण वातावरणात करण्यात आला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला श्री काळभैरवयाग

कर्नाटक येथील देवीउपासक हरिशगुरुजी यांच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमात कार्तिक कृष्ण पक्ष सप्तमी (१९ नोव्हेंबर २०१९) या दिनी असलेल्या श्री काळभैरव जयंतीच्या औचित्याने श्री काळभैरवयाग भावपूर्ण वातावरणात करण्यात आला.

सनातन संस्थेच्या कार्यास हिंदुत्वनिष्ठ उद्धव ठाकरे पाठिंबाच देतील !

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्व जपले. अशा हिंदुत्वाच्या मुशीतच श्री. उद्धव ठाकरे पुढे आले आहेत. सनातन संस्था हिंदुत्व आणि हिंदु धर्म यांच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहे.

(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदी घाला !’ – काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई

काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार हुसेन दलवाई यांनी ‘सनातन संस्था महाराष्ट्रात आतंकवाद पसरवते’, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत तिचा सहभाग आहे,’ असे आरोप करून या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी महाराष्ट्रातील नव्या सरकारकडे केली आहे.

सनातन संस्थेच्या साधकांनी घेतले शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे दर्शन !

सध्या पुरी येथील पुर्वाम्नाय गोवर्धन पिठाधिश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी  निश्चलानंद सरस्वती दक्षिण भारताच्या दौ-यावर आहेत. उडुपी येथे ते आले असता सनातन संस्थचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी त्यांचे दर्शन घेतले.

देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात हरिनाम दिंडीचे आगमन

व्यसनमुक्ती आणि षड्विकार निर्मूलन या उदात्त हेतूंनी देवद गावातील वारकरी संप्रदायाच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित केल्या जाणा-या ‘हरिनाम दिंडी’चे मार्गशीर्ष शुक्ल पक्षपंचमीला (१ डिसेंबर) येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले.