हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान द्या ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदूसंघटन आणि हिंदुत्वनिष्ठांमध्ये कुटुंबभावना निर्माण करणे अशा उद्देशाने येथील ‘श्रीकृष्ण रिसॉर्ट’मध्ये एक दिवसाची ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ घेण्यात आली.

हिंदु संस्कृतीचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करा ! – सौ. वैशाली परांजपे, सनातन संस्था

लहान-लहान कृतींतून धर्माचरण करून आपला धर्म आणि संस्कृती यांविषयीचा अभिमान वृद्धींगत करू शकतो, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. वैशाली परांजपे यांनी केले.

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. जीजी आणि सुपुत्र पू. नंदूदादा यांची देवद येथील सनातनच्या आश्रमाला मंगलभेट !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या पत्नी प.पू. (श्रीमती) सुशिला कसरेकर म्हणजे प.पू. जीजी आणि त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र पू. नंदूदादा कसरेकर यांनी देवद येथील सनातनच्या आश्रमाला १२ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता भेट दिली.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झाला प्रत्यंगिरा याग !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात १२ जानेवारीला तिसरा प्रत्यंगिरा याग पार पडला.

देहली येथील ‘विश्‍व पुस्तक मेळ्या’तील सनातन संस्थेच्या स्टॉलला मध्यप्रदेश माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट

देहली येथील ‘विश्व पुस्तक मेळ्या’तील सनातन संस्थेच्या स्टॉलला मध्यप्रदेश माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सदिच्छा भेट दिली.

गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा सनातन संस्थेशी काहीही संबंध नाही ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

सनातन संस्था ही अध्यात्मप्रसाराचे कार्य करते. सनातन संस्थेचा कोणत्याही हत्या प्रकरणांशी दुरान्वयेही संबंध नाही.

सनातन संस्थेच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांचा देहत्याग

सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात वास्तव्यास असणा-या सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांनी पौष पौर्णिमेस, म्हणजे १० जानेवारी २०२० या दिवशी दुपारी २ वाजून ५३ मिनिटांनी देहत्याग केला.

आजचे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही

१० जानेवारी या दिवशी चंद्रग्रहण आहे; मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे ग्रहणासंबंधीचे वेदादि नियम पाळण्याची आवश्यकता नाही.

अश्‍लील संकेतस्थळे (पॉर्न) पाहण्याच्या सवयीने देशातील १० कोटी लोक हिंसक

देशातील ३ कोटी मुले आणि ७ कोटी प्रौढ व्यक्ती यांना अश्लील संकेतस्थळे (पॉर्न) पाहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे ते हिंसक होत आहेत.