हंगरहळ्ळी (कर्नाटक) येथील भक्तवत्सल श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आज होणार चैतन्यमय आगमन !

साधक आणि भक्त यांना भरभरून आशीर्वाद देणारी, भक्तांच्या हाकेला धावून जाणारी श्री विद्याचौडेश्वरीदेवी आणि श्री मठाचे प.पू. श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामी यांचे आज (२६ फेब्रुवारीला) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चैतन्यमय आगमन होणार आहे.

चेन्नई येथील ‘हिंदू आध्यात्मिक सेवा मेळा २०२०’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग

चेन्नई (तमिळनाडू) येथील वेलाचेरी भागातील गुरुनानक महाविद्यालयामध्ये ११ वा हिंदू आध्यात्मिक सेवा मेळा २०२० पार पडला. या वेळी सनातन संस्थेकडून कक्ष लावण्यात आले होते.

समाजावरील आघात रोखण्यासाठी छत्रपतींप्रमाणे हिंदवी स्वराज्याची स्थापना आवश्यक ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था

आज प्रत्येक घराघरात माता जिजाऊ असायला हवी, असे प्रतिपादन सनातनच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले.

बेळ्ळतंगडी (कर्नाटक) येथील श्री चामुंडेश्‍वरी मंदिराजवळील धार्मिक सभेत सनातन संस्थेकडून मार्गदर्शन

बेळ्ळतंगडी (कर्नाटक) येथील बेळालुमधील श्री चामुंडेश्‍वरी मंदिराच्या परिसरात धार्मिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या साधिका सौ. लक्ष्मी पै यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

चंद्रपूर येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांची भेट

महाशिवरात्रीनिमित्त अंचलेश्‍वर गेट येथे सनातन संस्थेच्या वतीने सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

महाशिवरात्री निमित्त लावण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला मान्यवरांची भेट !

मुंबई, नवी मुंबई, पालघर येथे महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ९१ ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाचे भक्तीमय वातावरणात झाले शुभागमन !

रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाचे महाशिवरात्रीच्या मंगलदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भक्तीमय आणि चैतन्यपूर्ण वातावरणात शुभागमन झाले.

अखिल मानवजातीला मार्गदर्शक आणि अध्यात्मातील जिज्ञासूंमध्ये लोकप्रिय होत असलेले सनातन संस्थेचे ‘sanatan.org’ संकेतस्थळ !

‘sanatan.org’ या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील अध्यात्मशास्त्रीय ज्ञानात धर्मशास्त्रीय ज्ञान आणि पृथ्वीवर उपलब्ध नसलेले ईश्वरीय ज्ञान या दोहोंचा समावेश आहे.

कॉ. पानसरे खून प्रकरणातील अन्वेषणात गंभीरपणे लक्ष घालू ! – सतेज पाटील

विधानसभा अधिवेशनाच्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमवेत एक बैठक आयोजित करू. अन्वेषण अधिकारी आणि अधिवक्ता यांच्याशी सखोल चर्चा करून माहिती घेऊ, असे आश्वासन सतेज पाटील यांनी दिले.

केंद्र सरकारने राज्यघटनेच्या कलम २८ मध्ये सुधारणा करून संस्कृत भाषेला संरक्षण आणि अनुदान द्यावे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

आसाम सरकारने राज्यातील सरकारी मदरसे आणि संस्कृत विद्यालये यांना निधीअभावी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.