सनातन संस्थेच्या वतीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बांधली राखी !

सनातनच्या साधिका सौ. गिरीजा गावकर यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली. या वेळी सौ. गीता तुळशीदास गांजेकर आणि सौ. लता मारुति किल्लेकर याही उपस्थित होत्या.

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत रक्षाबंधन साजरे !

डोंबिवली येथे सनातन संस्थेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे शहर प्रमुख आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. राजेश मोरे यांना श्रीमती अमृता संभूस यांनी राखी बांधली.

अंनिसचा ‘अविवेकी’ चेहरा झाकण्यासाठी अविनाश पाटील यांचे सनातनवर बेछूट आरोप ! – सनातन संस्था

न्यायालय खोट्या आरोपांवर नव्हे, तर पुराव्यांच्या आधारे कारवाई करते. न्यायदेवता आणि ‘सत्याचाच विजय होतो’, या धर्मवचनावर सनातन संस्थेची श्रद्धा आहे.

डॉ. दाभोलकर हत्‍येचे अन्‍वेषण भरकटण्‍याला त्‍यांचे कुटुंबीयच उत्तरदायी ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

सनातन संस्‍थेच्‍या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘डॉ. दाभोलकर हत्‍या प्रकरण : प्रचार आणि वास्‍तव’

सप्‍तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्‍या माध्‍यमातून श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना स्‍फटिकाचे शिवलिंग देणे

सप्‍तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्‍या माध्‍यमातून दिलेले स्‍फटिकाचे शिवलिंग ‘जणू शिवाचे आत्‍मलिंगच आहे’, असे वाटणे आणि नाडीवाचनातही तसाच उल्लेख असणे

डॉ. दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिलेला नसतानाही सनातन संस्थेला दोषी ठरवणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अविवेकी पदाधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणार !

सनातनला दोषी ठरवणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अविवेकी पदाधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणार ! – सनातन संस्था

समाजाची सात्त्विकता वाढवणार्‍या कलाकृतींच्‍या निर्मितीत सहभागी व्‍हा !

गुरुदेवांचा संकल्‍प आणि साधकांची भक्‍ती यांमुळे देवतांची सात्त्विक चित्रे, नामजपाच्‍या पट्‍ट्या, सात्त्विक लिपी इत्‍यादी सनातनच्‍या कलाकृतींमध्‍ये ३० टक्‍क्‍यांहून अधिक देवतातत्त्व आले आहे. अशा अनेक कलाकृती आपल्‍याला सिद्ध करायच्‍या असून त्‍या समाजाची सात्त्विकता वाढवण्‍यासाठी साहाय्‍यभूत ठरणार आहेत.

अखंड नामजप, तसेच चिकाटीने व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्‍या ईश्वरपूर (जि. सांगली) येथील श्रीमती वैशाली मुंगळे संतपदी विराजमान !

श्रीरामाचा अखंड नामजप करून त्याद्वारे इतरांना नामजपाची गोडी लावणार्‍या आणि चिकाटीने व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्‍या ईश्वरपूर येथील श्रीमती मुंगळेआजी यांना ७ जुलै या दिवशी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘संत’ म्हणून घोषित केले.

अधिक मासात सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ इतरांना देऊन सर्वश्रेष्‍ठ अशा ज्ञानदानाचे फळ मिळवा !

इतरांना देण्‍यासाठी सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ हवे असल्‍यास त्‍यांची मागणी लवकरात लवकर स्‍थानिक वितरकांकडे करावी अथवा https://sanatanshop.com/shop/ या लिंकवर नोंदवावी.