भक्तवत्सल श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीच्या कृपाशीर्वादाने सनातनच्या आश्रमात संपन्न झाला शतचंडी याग !

हंगरहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री विद्याचौडेश्वरीदेवीच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील भूलोकावरील शिवक्षेत्री म्हणजेच सनातनच्या आश्रमात २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शतचंडी याग देवीच्याच उपस्थितीत संपन्न झाला.

पवित्र गंगेत डुबकी मारण्याचे शारीरिक आणि आध्यात्मिक लाभ मोठे ! – दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी र्‍होड्स

क्रिकेट क्षेत्रात ‘सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू’ असा बहुमान मिळवलेले दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू जाँटी -होड्स यांनी त्यांच्या ‘ट्विटर’ खात्यावरून नमस्काराच्या मुद्रेत गंगास्नान करतांनाचे छायाचित्र प्रसारित केले आहे.

नागरिकांनी एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता भारतीय पद्धतीने हात जोडून ‘नमस्ते’ म्हणा !

‘कोरोना’ हा साथीचा रोग असल्याने इतरांच्या संपर्कात येताच दुस-यालाही त्याची लागण होते. यामुळे नागरिकांनी एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता भारतीय पद्धत म्हणजे हात जोडून ‘नमस्ते’ म्हणावे, असे आवाहन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले.

प्रतिदिन दुर्गा सप्तशती पोथीतील देवीकवच म्हणा !

आपत्कालात देहाचे रक्षण होण्यासाठी, तसेच अनेक व्याधींपासून (हाडेदुखी, स्नायूदुखी, अनेक दुर्धर आजार, रक्तव्याधी) मुक्त होण्यासाठी साधकांनी प्रतिदिन दुर्गा सप्तशतीमधील चण्डिकवच (देवीकवच) म्हणणे आवश्यक आहे.

महाशिवरात्रीच्या मंगलदिनी ‘रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायका’चा सनातनच्या आश्रमातील आगमनाचा चैतन्यमय सोहळा !

सप्तर्षींनी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनानुसार सनातनच्या रामनाथी आश्रमात महाशिवरात्रीच्या म्हणजे २१.२.२०२० या दिवशी रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाचे मिरवणुकीद्वारे शुभागमन झाले.

हंगरहळ्ळी (कर्नाटक) येथील भक्तवत्सल श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आज होणार चैतन्यमय आगमन !

साधक आणि भक्त यांना भरभरून आशीर्वाद देणारी, भक्तांच्या हाकेला धावून जाणारी श्री विद्याचौडेश्वरीदेवी आणि श्री मठाचे प.पू. श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामी यांचे आज (२६ फेब्रुवारीला) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चैतन्यमय आगमन होणार आहे.

चेन्नई येथील ‘हिंदू आध्यात्मिक सेवा मेळा २०२०’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग

चेन्नई (तमिळनाडू) येथील वेलाचेरी भागातील गुरुनानक महाविद्यालयामध्ये ११ वा हिंदू आध्यात्मिक सेवा मेळा २०२० पार पडला. या वेळी सनातन संस्थेकडून कक्ष लावण्यात आले होते.

समाजावरील आघात रोखण्यासाठी छत्रपतींप्रमाणे हिंदवी स्वराज्याची स्थापना आवश्यक ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था

आज प्रत्येक घराघरात माता जिजाऊ असायला हवी, असे प्रतिपादन सनातनच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले.

बेळ्ळतंगडी (कर्नाटक) येथील श्री चामुंडेश्‍वरी मंदिराजवळील धार्मिक सभेत सनातन संस्थेकडून मार्गदर्शन

बेळ्ळतंगडी (कर्नाटक) येथील बेळालुमधील श्री चामुंडेश्‍वरी मंदिराच्या परिसरात धार्मिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या साधिका सौ. लक्ष्मी पै यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

चंद्रपूर येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांची भेट

महाशिवरात्रीनिमित्त अंचलेश्‍वर गेट येथे सनातन संस्थेच्या वतीने सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.