ब्राह्मण संघाच्या वतीने संत पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे यांचा ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे सन्मान !
‘ब्राह्मण सभा इस्लामपूर आणि वाळवा तालुका ब्राह्मण संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या एका समारंभात तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी म्हणून सनातनच्या संत पू. (श्रीमती) वैशाली सुरेश मुंगळे (वय ७६ वर्षे) यांनाही सन्मानित करण्यात आले.