संभाजी ब्रिगेडकडून फेसबूक पोस्टद्वारे सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमावर आक्रमण करण्याची चिथावणी !
‘सनातन पंचांग २०२२’मध्ये राजमाता जिजाऊंचा तिथीनुसार १७ जानेवारी २०२२ असा उल्लेख करण्यात आला आहे. हा उल्लेख योग्य असतांना जाणीवपूर्वक ‘तो दिनांकानुसार १२ जानेवारी २०२२ असा हवा’, असा कागांवा करत मराठा सेवा संघ, तसेच संभाजी ब्रिगेड पुरस्कृत फेसबूक पृष्ठांवर सनातनविषयी अपप्रचार आणि चिथावणीखोर पोस्ट करण्यात आल्या आहेत.