सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी दुर्दैवी ! – भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा
‘गूगल’वर ‘सनातन संस्था’ सर्च केल्यानंतर प्रथम ‘आरती’चे चित्र येईल; मात्र रझा अकादमीच्या संकेतस्थळावर सर्च केल्यानंतर हुतात्मा बोधचिन्हाला लाथ मारल्याचे चित्र दिसून येते!
‘गूगल’वर ‘सनातन संस्था’ सर्च केल्यानंतर प्रथम ‘आरती’चे चित्र येईल; मात्र रझा अकादमीच्या संकेतस्थळावर सर्च केल्यानंतर हुतात्मा बोधचिन्हाला लाथ मारल्याचे चित्र दिसून येते!
राज्याचे पर्यावरणमंत्री मा. आदित्यजी ठाकरे यांना मिळालेल्या धमक्यांचा सनातन संस्था तीव्र शब्दांत निषेध करते. या धमक्या देणार्या दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आम्ही करत आहोत;…
‘सनातनच्या विविध ठिकाणच्या आश्रमांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे वेगवेगळ्या वयोगटांतील शेकडो साधक रहात आहेत. यातील वृद्ध साधकांसाठी, तसेच हृदयविकार, मधुमेह, संधीवात आदी शारीरिक व्याधी असलेल्या रुग्ण-साधकांसाठी आश्रमांत पुढील उपकरणांची आवश्यकता आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तजयंतीच्या निमित्ताने निघणार्या दत्तपालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात सायंकाळी ७ वाजता शंखध्वनी आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषाच्या गजरात आगमन झाले.
श्री. महेश आणि श्री. मंदार काळे यांना आश्रमातील ध्यानमंदिर, कलेशी संबंधित कार्य आणि ‘सनातन प्रभात’ या नियतकालिकांचे कार्य यांविषयीची माहिती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर अन् श्री. अमोल हंबर्डे यांनी दिली.
‘जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी’चे कुलगुरु डॉ. रोशन लाल रैना यांनी १२ डिसेंबर या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम आणि आध्यात्मिक संशोधन केंद्र यांना भेट दिली. त्यांनी येथे चालू असलेले आध्यात्मिक संशोधन, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रसार यांच्या संदर्भातील कार्य आस्थेने जाणून घेतले.
सर्वांनी हिंदु धर्मासाठी आणि हिंदु राष्ट्रासाठी संघटित होऊन कार्य करणे, हेच ह.भ.प. पू. वक्तेबाबांना अपेक्षित आहे, असे मार्गदर्शन नगर जिल्ह्यातील लोणी येथे झालेल्या वारकरी अधिवेशनात ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे शास्त्री यांनी मांडले.
‘सनातनच्या संपर्कात असलेले एक ज्योतिषी सनातनच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ साधना करणार्या साधकांविषयी पुढील प्रकारचे अपसमज पसरवत असल्याचे निदर्शनास आले आहे.
घरी राहूनही त्यांनी भाव वाढवला आणि आज त्यांनी संतपद गाठले आहे. आज ते पू. वीरेंद्र सोनी झाले आहेत.’’ हे ऐकताच सोनी परिवारातील सर्व सदस्य आनंदित झाले !
नामाने पवित्रता येते; नामदिंडी गावाचा परिसर पुनित करते. प्रत्येक युगात अधर्म वाढला की, ईश्वर अवतार घेतो; परंतु कलियुग चालू होऊनही ईश्वराचा अवतार अद्याप झालेला नाही. अवतार होण्यासाठी प्रत्येक युगात भक्तांनी प्रार्थना केली आणि मग अवतार झाले. आता विविध संत, संप्रदाय आदी नाम, भजन, कीर्तन यांच्या माध्यमातून कार्य करत आहेत; हे सारे अधर्माला थोपवून धरत आहेत.