प्रजासत्ताकदिनानिमित्त देवद (पनवेल) येथील ‘सनातन संकुल’मधील बालसाधकांनी काढली प्रबोधन फेरी
२६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने देवद गावातील ‘सनातन संकुल’मधील सनातनच्या बालसाधकांनी उत्स्फूर्तपणे प्रबोधन फेरी काढली. प्लास्टिकचा राष्ट्रध्वज न वापरण्याविषयी या वेळी बालसाधकांनी प्रबोधन केले.