ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला गोवा राज्य आणि सोलापूर (महाराष्ट्र) येथे समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने राष्ट्रव्यापी ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ म्हणून राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ग्रंथांचा प्रसार होत असून समाजातून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे मुंबईत निधन

संगीताच्या माध्यमातून तब्बल ८ दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या गानकाेकिळा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे मुंबईत ‘ब्रीच कॅंडी’ रुग्णालयात सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी निधन झाले. भारतरत्न लतादीदी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शाेककळा पसरली आहे.

‘सनातनचे प्रत्येक अभियान आणि उपक्रम यांना देव भरभरून प्रतिसाद देत असल्याने साधकांनी ‘प्रतिमा जपणे’ यांसह अन्य स्वभावदोषांना बळी न पडता अधिकाधिक लोकांना संपर्क करावा !’ – सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

या उपक्रमांसाठी समाजातील व्यक्तींना संपर्क केल्यावर ‘ते आपली वाट पहात आहेत’, याउलट ‘साधक समाजात जाऊन अर्पण मागण्यास आणि प्रायोजक मिळवण्यास टाळाटाळ करत आहेत’. साधकांतील ‘प्रतिमा जपणे’ हा अहंचा पैलू प्रबळ असल्याने ते समाजात जाऊन अर्पण मागण्यास टाळाटाळ करत आहेत.

कर्मयोग्याप्रमाणे निरपेक्षतेने जीवन जगणारे मुंबई येथील कै. जयंत नारायण गोडबोले (वय ७७ वर्षे) !

जयंत नारायण गोडबोले (वय ७७ वर्षे), ४.२.२०२२ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

काँग्रेसने स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जातीयवाद निर्माण केला ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

वर्ष १९८४ ची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. शीख पंथ हा जातीयवादी वा देशद्रोही नाही; मात्र काँग्रेसने स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जातीयवाद निर्माण केला.

समाजद्रोही आणि धर्मद्रोही निर्णय त्वरित मागे घ्या ! – सनातन संस्थेची मागणी

पंजाबमधील युवापिढी पूर्णपणे व्यसनाधीन झाली आहे, त्यावर ‘उडता पंजाब’सारखा सिनेमाही आला. हे वास्तव पहाता महाराष्ट्राने सजग होऊन खरेतर राज्य ‘दारूमुक्त’, ‘व्यसनमुक्त’ होण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत.

प्रजासत्ताकदिनानिमित्त देवद (पनवेल) येथील ‘सनातन संकुल’मधील बालसाधकांनी काढली प्रबोधन फेरी

२६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने देवद गावातील ‘सनातन संकुल’मधील सनातनच्या बालसाधकांनी उत्स्फूर्तपणे प्रबोधन फेरी काढली. प्लास्टिकचा राष्ट्रध्वज न वापरण्याविषयी या वेळी बालसाधकांनी प्रबोधन केले.

रहाता (जिल्हा नगर) येथील सनातनच्या ३९ व्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी लोंढे (वय ९५ वर्षे) यांचा देहत्याग !

रहाता (जिल्हा नगर) येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढे (वय ९५ वर्षे) यांनी २७ जानेवारी २०२२ या दिवशी दुपारी २.२५ वाजता त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळामुळे देहत्याग केला.

सनातन संस्थेशी जिव्हाळ्याचे संबंध असणारे संपादक दिनकर रायकर !

दैनिक ‘लोकमत’चे समूह संपादक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले दिनकर रायकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.