कोल्हापूर येथे सनातन निर्मित ‘ज्ञानयोगी पू. अनंत आठवले’ या ग्रंथाचे प्रकाशन !

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे ज्येष्ठ बंधू पू. अनंत आठवले यांच्या चरित्राचा दुसरा खंड ‘ज्ञानयोगी पू. अनंत आठवले’ या ग्रंथाचे प्रकाशन सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते २६ मार्च या दिवशी करण्यात आले.

कळंबोली येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कमलेश कोठारी यांची देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट !

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि भाजपचे संघटक श्री. कमलेश कोठारी यांनी नुकतीच येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात करण्यात येणार्‍या विविध सेवांविषयी जाणून घेतले.

Exclusive : मुसलमान मुलींना ‘हिजाब’ खरंच हवा आहे का ?

शृंगार हे स्त्रीचे नैसर्गिक कर्म आहे; परंतु ते नाकारून काळ्या स्कार्फमध्ये तिला गुंडाळणार्‍या प्रवृत्तीविषयी खरे तर स्त्रीमुक्ती चळवळ असायला हवी; पण हे आधुनिक स्त्रीमुक्तीवाल्यांना कोण सांगणार ?

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे आवश्यक अधिष्ठान साधनेतूनच निर्माण होणार आहे ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्था

आपल्याला यापुढील काळात जे हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. त्यातील पहिली पायरी साधना आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे आवश्यक अधिष्ठान साधनेतूनच निर्माण होणार आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले.

देवीहसोळ (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनचे ६५ वे संत पू. जनार्दन कृष्णाजी वागळेआजोबा (वय १०० वर्षे) यांचा देहत्याग !

त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, एक मुलगी, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. पू. वागळेआजोबा १५ फेब्रुवारी २०१७ या दिवशी सनातनच्या व्यष्टी संतपदी विराजमान झाले होते.

मुलुंड, मुंबई येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे साधक मंदार गाडगीळ यांचा ‘एल्.टी.आय.’ आस्थापनाकडून ‘स्पार्टन’ (‘योद्धा’) ही उपाधी देऊन गौरव !

श्री. मंदार गाडगीळ हे ‘एल् अँड टी. (लार्सन अँड टुब्रो) इन्फोटेक’ या आंतरराष्ट्रीय आस्थापनामध्ये ‘महाव्यवस्थापक (जनरल मॅनेजर)’ या पदावर चाकरीला आहेत.

सनातन संस्थेच्या साधकांनी ‘जे के योग’चे प्रवर्तक स्वामी मुकुंदानंदजी यांची घेतली सदिच्छा भेट !

तुलसी भवनामध्ये स्वामी मुकुंदानंदजी यांचे ५ दिवस प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांची भेट घेण्यात आली. याप्रसंगी स्वामी मुकुंदानंदजी यांनी सनातनच्या कार्याचे कौतुक केले आणि संस्थेच्या कार्याला आशीर्वाद दिले.

‘‘द कश्मीर फाईल्स’च्या निमित्ताने…

बॉलीवूडमध्ये प्रतिवर्षी गुंड, माफिया, ‘ड्रग्स पेडलर’, गंगबाईंसारख्या वेश्यागृहांच्या मालकिणी यांचे उदात्तीकरण करणारे अनेक ‘ड्र्रामा फिल्म्स’ प्रदर्शित होतात. असे चित्रपट पहाण्यापेक्षा भारतियांनी ‘द काश्मीर फाइल्स’ पहाणे देशहिताचे ठरेल. त्यामुळे हा चित्रपट एकदा तरी अवश्य पहा !

साधकांनो, ‘सतत नकारात्मक विचार करण्याने आणि त्याविषयी इतरांशी वारंवार बोलण्याने मनावर नकारात्मकतेचा संस्कार होतो’, हे लक्षात घेऊन योग्य मार्गदर्शन, तसेच स्वयंसूचना घ्या !

स्वतःच्या समस्यांविषयी विचार करत रहाण्याने, तसेच त्यांविषयी इतरांना सतत सांगितल्याने मनाला नकारात्मक स्वयंसूचना दिल्याप्रमाणे होते.

अरबी समुद्रातील चक्रीवादळांच्या तीव्रतेमध्ये २० ते ४० टक्क्यांनी वाढ !

 उत्तर हिंदी महासागरातील प्रत्येक चौथ्या चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होत आहे. जगभरातील चक्रीवादळांपैकी ६ टक्के चक्रीवादळे उत्तर हिंदी महासागरात सिद्ध होत आहेत. अरबी समुद्रातील चक्रीवादळांची तीव्रता २० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे, असे हवामान शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे.