अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !

‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांना भेट म्हणून सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ देण्यासाठी सराफी दुकानदारांना उद्युक्त करा !

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने साधकांनी सर्वत्रच्या सराफी दुकानदारांना संपर्क करावा.

सर्वसामान्य हिंदूंना हिंदु राष्ट्राची आवश्यकता पटवून देणे महत्त्वाचे !– अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इंदूर येथे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. या अधिवेशनाला अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी विविध मान्यवरांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा निर्धार केला.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी भगवंताचे भक्त होणे आवश्यक ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गदग (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-संघटक कार्यशाळा पार पडली !

सनातनच्या इंग्रजी ‘ई-बूक’चे वाराणसी येथे लोकार्पण !

चैत्र नवरात्रीच्या पवित्र काळात वाराणसी येथील ‘अखिल भारतीय धर्मसंघ शिक्षा मंडल’चे महामंत्री श्री. जगजीतन पांडे यांच्या शुभहस्ते ‘इम्पॉर्टन्स ऑफ पर्सनॅलिटी डिफेक्ट रिमूव्हल अँड इन्कलकेटिंग व्हर्च्यूज्’ या सनातनच्या इंग्रजी भाषेतील ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले.

समान नागरी कायद्याचे खरोखर पालन होईल का ?

हिबाज बंदीच्या संदर्भात न्यायालयाचा निकाल आल्यानंतर थेट परीक्षांवर बहिष्कार घालण्याचे हिजाबी विद्यार्थिनींचे उदाहरण ताजे आहे. त्यामुळे समान नागरी संहिता लागू झाला, तरी त्याचे खरोखर पालन होईल का, हा प्रश्‍नच आहे !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मंगलमय वातावरणात गुढीपूजन !

हिंदु नववर्षारंभाच्या निमित्ताने म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथील सनातनच्या आश्रमात २ एप्रिल २०२२ या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

गेग्रेरियन दिनदर्शिकेनुसार नववर्ष साजरे करण्याला कुठलाही ठोस आधार नाही ! – आचार्य अशोककुमार मिश्र, अध्यक्ष, वर्ल्ड ॲस्ट्रो फेडरेशनचे एशिया चॅप्टर, बिहार

ज्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, त्या शुभ दिवशी हिंदु नववर्ष साजरे केले जाते. या दिवशी नववर्ष साजरे करणे वैज्ञानिक, प्राकृतिक आणि सामाजिक दृष्टीने योग्य आहे, तसेच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा उत्तम आहे; मात्र गेग्रेरियन दिनदर्शिकेनुसार नववर्ष साजरे करण्याला कुठलाही ठोस आधार नाही.

जर रशिया युक्रेनमधून बाहेर गेला नाही, तर तिसरे महायुद्ध निश्चित ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

झेलेंस्की पुढे म्हणाले की, युक्रेन रशियासमवेत शांतता कराराविषयी चर्चा करण्यास सिद्ध आहे; मात्र त्यासाठी आमच्या २ अटी आहेत. या चर्चेसाठी कोणत्याही तिसर्‍या देशाने हमी द्यावी, तसेच जनमत संग्रह केला पाहिजे.

जीवनात आध्यात्मिक मित्र असणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

अर्जुनाची द्विधा मनस्थिती दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने गीता सांगून धर्मसंस्थापनेचे महान कार्य करून घेतले. याचप्रमाणे आपल्या मनातील विचार सांगण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनात आध्यात्मिक मित्र असणे आवश्यक आहे. आपल्या मनातील विषय, चिंता आपण मित्राजवळ बोलून दाखवल्यास आपले मन हलके होते आणि मनावरील ताणही दूर होतो, असे मार्गदर्शन सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी