ईरोड (तमिळनाडू) येथे कावेरी नदीच्या काठी असलेल्या मंदिर परिसरात अतिरुद्र महायाग !

तमिळनाडू राज्यातील कावेरी नदीच्या काठी असलेल्या ईरोड शहरात २१ एप्रिलपासून अतिरुद्र महायागाला प्रारंभ झाला असून हा याग १ मे पर्यंत चालणार आहे. कावेरी नदीच्या काठी श्रीसुंदरांबिका आणि त्याच्या बाजूला श्री चोळीश्वर मंदिर आहे. या मंदिर परिसरात अतिरुद्र महायाग चालू आहे.

अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !

२२.४.२०२३ या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. ‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.

‘विस्तारा वाहिनी’ने ‘सनातन संस्थे’च्या ‘रौप्य महोत्सवा’च्या निमित्ताने राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा केला सत्कार !

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ‘विस्तारा वाहिनी’चे कार्यकारी संचालक श्री. किरण कुमार डी.के. यांची सदिच्छा भेट घेतली.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात ९ हजार हिंदूंच्या उपस्थितीत ‘सनातन गौरव दिंडी’!

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने ‘सनातन धर्मावर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी, तसेच सनातन धर्माचा गौरव वाढवण्यासाठी’ रविवारी सायंकाळी पुणे येथे ९ हजारांहून अधिक हिंदूंनी एकत्र येऊन ‘सनातन गौरव दिंडी’ काढली. यात २० हून अधिक विविध संप्रदाय-संघटना सहभागी झाल्या होत्या.

सनातन गौरवदिंडी

सनातन धर्माच्या प्रसारासाठी समर्पित असलेल्या सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ‘सनातन गौरवदिंडी’चे आयोजन केले आहे.

देहली येथे पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांची सनातनच्या धर्मप्रचारकांनी घेतली सदिच्छा भेट !

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आणि साधक श्री. गिरीश पुजारी यांनी पू. घोष यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्या पत्नी सौ. कृष्णा घोष या उपस्थित होत्या. त्यांच्याशी वार्तालाप करत असतांना पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे देत आहोत.

साधकांनो, आपोआप होत असलेला नामजप न करता आध्‍यात्‍मिक त्रास न्‍यून होण्‍यासाठी उपाय म्‍हणून सांगितलेला नामजप करा !

‘काही वेळा साधकांचा आध्‍यात्‍मिक त्रास न्‍यून होण्‍यासाठी उपाय म्‍हणून संत किंवा उत्तरदायी साधक त्‍यांना विशिष्‍ट नामजप करण्‍यास सांगतात, त्यावेळी ‘आमच्‍याकडून उपायांसाठी सांगितलेला नामजप होत नाही….

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांची घेतली सदिच्छा भेट !

भाजपचे सरचिटणीस, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. विलास मडिगेरी यांचा सनातन संस्थेच्या कार्यात सहभाग असतो. संस्थेच्या कार्याचे ते नेहमीच कौतुक करतात.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे जागतिक अध्यात्म महोत्सवाला प्रारंभ; सनातन संस्था सहभागी !

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि ‘हार्टफुलनेस’ नावाची आध्यात्मिक संस्था ‘जागतिक अध्यात्म महोत्सवा’चे आयोजन करत आहे. हा महोत्सव १४ ते १७ मार्च या ४ दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. ‘कान्हा शांति वनम्’ नावाच्या ध्यानधारणेसाठीच्या जगातील सर्वांत मोठ्या सभागृहात हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात सनातन संस्था सहभागी होणार आहे.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर येथील पत्रकारांशी मुक्त संवाद !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ७ मार्च २०२४ या दिवशी सोलापूरमधील पत्रकारांशी संवाद साधला, या वेळी पत्रकारांनी विचारलेले प्रश्न आणि श्री. राजहंस यांनी दिलेली उत्तरे येथे देत आहोत.