गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सोलापूर येथील ‘बी.आर्. न्यूज’ वाहिनीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन !

सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येथील ‘बी.आर्. न्यूज’ या स्थानिक वृत्तवाहिनीवर ‘गुरुपौर्णिमा विशेष’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सनातन संस्थेच्या कु. वर्षा जेवळे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांचा सहभाग होता

महाराष्ट्रात विविध ठिकाणी पूरस्थिती !

४ जुलै या दिवशी रात्रभर आणि ५ जुलै या दिवशी सकाळपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !

समष्टी कार्याची तळमळ असलेले पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान !

उत्तर भारतात प्रतिकूल परिस्थितीतही धर्मप्रचाराचे कार्य अत्यंत तळमळीने करणारे आणि प्रेमभावाने हिंदुत्वनिष्ठांनाही आपलेसे करणारे विनम्र वृत्तीचे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता येथे झालेल्या एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आली.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त धर्मकार्य करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या घोषणेने आनंदाचे वातावरण !

वर्ष २०१२ पासून दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू झाल्यानंतर जीवनमुक्तीची प्रक्रिया चालू झालेली आहे. अधिवेशनात ५ संत झाले आणि आजपर्यंत ४० हिंदुत्वनिष्ठांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जीवनमुक्त झाले आहेत. हीच या अधिवेशनाची फलनिष्पती आहे.

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा कृपाशीर्वाद आणि त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे शब्दातीत ज्ञान नेहमीच्या तुलनेत सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुसेवा अन् धनाचा त्याग करणाऱ्याला गुरुतत्त्वाचा लाभ सहस्रपट अधिक होतो.

ट्रेड युनियनच्या इतिहासात पहिल्या महिला सरचिटणीसपदी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणाऱ्या सौ. प्रविणा पाटील !

देशातील ट्रेड युनियनच्या इतिहासामध्ये संघटनेच्या सरचिटणीस पदावर महिला पदाधिकारी यांची यापूर्वी निवड झाली नव्हती. सौ. प्रविणा पाटील या सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात.

रशिया-युक्रेन युद्ध अनेक वर्षे चालू राहू शकते ! – नाटो

पश्चिमी देशांना युक्रेनला दीर्घकाळ साहाय्य करत रहाण्याची सिद्धता ठेवावी लागेल. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध काही वर्षे चालू राहू शकते.

संत आणि धर्मवीर यांचा सन्‍मान

अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या व्‍यासपिठावर नेपाळ येथील ‘हिंदु विद्यापिठा’चे अध्‍यक्ष डॉ. भोलानाथ योगी यांनी सनातनच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु (सुश्री) स्‍वाती खाडये यांना रुद्राक्ष माळ आणि भेटवस्‍तू देऊन सन्‍मान केला.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन येथील कार्याची ओळख करून घेतली. आश्रमदर्शन केलेल्या हिंदुत्वनिष्ठानी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.