सनातन संस्थेच्या वतीने कर्नाटकमध्ये ३२ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

बेंगळुरू येथे सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा, कारवार येथे पू.  विनायक कर्वे, मंगळुरू येथे पू. (श्रीमती) राधा प्रभु आणि बालकसंत पू. भार्गवराम प्रभु, तर शिवमोग्गा येथे सुप्रसिद्ध पंचशिल्पकार पू. काशिनाथ कवटेकर उपस्थित होते.

परात्परगुरु डॉ. आठवले यांचा साधना प्रवास : खंड १, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूं कडून शिकणे’, या सनातन-निर्मित ग्रंथाचे प्रकाशन !

कोल्हापूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात सनातन-निर्मित ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधना प्रवास : खंड १, या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन सनातनच्या संत पू. आधुनिक वैद्या (श्रीमती) शरदिनी कोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

मदुराई (तमिळनाडू) येथे सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

१० जुलै २०२२ या दिवशी मदुराई (तमिळनाडू) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या कार्यक्रमाचा प्रारंभ प्रार्थनेने झाला. यानंतर सौ. लक्ष्मी नायक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरुपौर्णिमेच्या संदेशाचे वाचन केले.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात १५३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात १५३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये देहली, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.

साधकांनो, प्रत्येक सेवा समर्पितभावाने करून गुरुपौर्णिमेनिमित्त सेवारूपी गुरुपूजन करा !

‘आपल्या जीवनात कितीही मोठे संकट आले, तरीही त्या प्रसंगात गुरुदेवांवर श्रद्धा ठेवल्याने त्या संकटांवर सहजतेने मात करता येते’, याची सहस्रो साधकांनी प्रचीती घेतली आहे.

सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्माई यांना निमंत्रण !

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्माई यांना देण्यात आले. सनातन संस्थेच्या सौ. वनजा यांनी मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन त्यांना हे निमंत्रण दिले.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सोलापूर येथील ‘बी.आर्. न्यूज’ वाहिनीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन !

सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येथील ‘बी.आर्. न्यूज’ या स्थानिक वृत्तवाहिनीवर ‘गुरुपौर्णिमा विशेष’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सनातन संस्थेच्या कु. वर्षा जेवळे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांचा सहभाग होता

महाराष्ट्रात विविध ठिकाणी पूरस्थिती !

४ जुलै या दिवशी रात्रभर आणि ५ जुलै या दिवशी सकाळपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !

समष्टी कार्याची तळमळ असलेले पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान !

उत्तर भारतात प्रतिकूल परिस्थितीतही धर्मप्रचाराचे कार्य अत्यंत तळमळीने करणारे आणि प्रेमभावाने हिंदुत्वनिष्ठांनाही आपलेसे करणारे विनम्र वृत्तीचे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता येथे झालेल्या एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आली.