तणावमुक्तीसाठी स्वभावदोष दूर करण्यासह गुणसंवर्धन करणे आवश्यक ! – सौ. वैदेही पेठकर, सनातन संस्था

तणाव दूर करण्यासाठी मुलांच्या व्यक्तिमत्त्वातील दोषांवर परिणामकारक ठरणार्‍या गुणांचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे आणि हे काम शिक्षकांच्या माध्यमातून होणे सहज शक्य आहे. त्यामुळे सनातन संस्था शिक्षक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. वैदेही पेठकर यांनी केले.

चेन्नई येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

सनातनच्या ग्रंथांतील मार्गदर्शन प्रत्येकाने आचरणात आणले, तरच आपल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि हरिहरबुक्का निर्माण होऊ शकतात, असे मार्गदर्शन श्री. बालगौथमन्जी यांनी केले.

नगर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा !

सध्याचा काळ वाईट आहे, याची पावले ओळखून सर्वांनी अध्यात्माची कास धरून सतत साधना करणे आवश्यक आहे, तरच या आपत्काळात भगवंत आपले रक्षण करेल, असे प्रतिपादन नाथ संप्रदायाचे संशोधक, नगर येथील हिंदुत्वनिष्ठ आणि पत्रकार श्री. मिलिंद चवंडके यांनी केले.

रायगड जिल्ह्यात गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला !

राष्ट्र घडण्यासाठी धर्माची नितांत आवश्यकता आहे. देव, देश आणि धर्म यांच्या आड कुणी येत असेल, तर त्याचा बीमोड करायला हवा. यासाठी प्रथम आपण धर्माचे पालन करायला हवे. सत्याची बाजू सोडू नये. सत्य नसेल, तर ज्ञान फलित होत नाही.

उत्तर आणि पूर्वोत्तर भारत क्षेत्रात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित ‘ऑनलाईन’ बैठकांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

गुरुपौर्णिमेचा समाजातील अधिकाधिक लोकांना लाभ व्हावा, तसेच गुरुपौर्णिमेचे महत्त्व समाजामध्ये पोचवण्याच्या कार्यात समाजाचाही सहभाग व्हावा, या उद्देशाने उत्तर आणि पूर्वोत्तर भारत क्षेत्रातील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन करण्यात आले.

मुंबईसह उपनगरांमध्ये सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेला भाविक आणि जिज्ञासू यांची उपस्थिती !

मुंबईसह नवी मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांत असलेले विविध गुरुपौर्णिमांच्या ठिकाणी जिज्ञासू आणि भाविक यांनी उपस्थित राहून गुरुपूजन अन् अध्यात्माविषयीच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

सनातन संस्थेच्या वतीने नवी देहली, नोएडा, मथुरा (उत्तरप्रदेश) आणि फरिदाबाद (हरियाणा) येथे चैतन्यमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

मथुरामधील श्रीजी गार्डन सोसायटीमध्ये आणि फरिदाबादच्या सेक्टर २८ मधील रघुनाथ मंदिर येथे चैतन्यमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा झाला. या महोत्सवाचा मोठ्या संख्येने जिज्ञासूंनी लाभ घेतला.

कोल्हापूर जिल्ह्यात ५ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहर, इचलकरंजी, गडहिंग्लज, आजरा, मलकापूर या ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडला. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस असूनही या उत्सवांना जिज्ञासूंनी चांगला प्रतिसाद दिला.

मंदाकिनी डगवार, सनातन संस्था हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्री गुरूंच्या समष्टी रूपाची सेवा ! – पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार, सनातन संस्था

वासंती मंगल कार्यालय येथे झालेल्या महोत्सवाला निवृत्त जिल्हा न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. या महोत्सवाचा ४०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

यवतमाळ जिल्ह्यात ४ ठिकाणी महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

हिंदु धर्माला उत्पत्ती, स्थिती आणि लय ही बंधने लागू होत नाहीत. हिंदु धर्माचा नाश कधीही होऊ शकत नाही. हिंदु धर्मरक्षणासाठी प्रयत्न केल्याने आपली साधना होणार आहे, असे मार्गदर्शन यवतमाळ येथील गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित असणारे प्रमुख अतिथी श्री. सूरज गुप्ता यांनी केले.