नागदेववाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामस्थांनी दीप अमावास्या धर्मशास्त्रानुसार साजरी केली !

नागदेववाडी येथील ग्रामस्थ दीप अमावास्येला ‘गटारी अमावास्या’, असे म्हणत असत. हा अपप्रचार आहे हे लक्षात घेऊन येथील ‘भगवा रक्षक’चे धर्मप्रेमी श्री. राहुल पाटील यांनी गावात या सणाविषयीचे धर्मशास्त्र सांगून याविषयी जागृती केली.

वाराणसीसारखे स्थान मी जगात अन्यत्र कुठे पाहिले नाही ! – जगप्रसिद्ध अमेरिकी अभिनेते ब्रॅड पिट

वाराणसीसारखे स्थान मी जगात अन्यत्र कुठे पाहिले नाही. मी आतापर्यंत जेवढे विश्वभ्रमण केले, त्यामध्ये या शहराला माझ्या मनात विशेष स्थान आहे, असे वक्तव्य जगप्रसिद्ध अमेरिकी अभिनेते आणि चित्रपट निर्माते ब्रॅड पिट यांनी केले.

सनातन संस्थेच्या वतीने तेलंगाणातील भाग्यनगर आणि इंदूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

केवळ श्री गुरूंमध्येच ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्यासारखे दिव्य कार्य करण्याची क्षमता असते. श्री गुरूच आपल्याला सर्वाेच्च ज्ञान प्रदान करू शकतात. हिंदु म्हणून आज आपण गुरुस्थानाचे रक्षण करून त्यांचा सन्मान राखला पाहिजे.

उष्णतेच्या तडाख्यात युरोप !

तापमानातील ही वाढ एकाएकी नाही. या विषयावर संशोधन करणार्‍या तज्ञांच्या गटाने ‘या तापमानवाढीला मानवी चुकाच कारणीभूत आहेत’, असा निष्कर्ष काढला आहे. घर, कारखाना, वाहतूक यांसाठी मोठ्या प्रमाणात तेल, गॅस, कोळसा यांचा वापर, प्रदूषण करणारे उद्योग, उष्णतेचे उत्सर्जन करणारे व्यवसाय यांमुळे तापमानात वाढ होत आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते ‘श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास’ या मराठी ग्रंथाचे प्रकाशन !

सनातनच्या आश्रमात ‘श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास (खंड २)’ या सनातनच्या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते १३ जुलै २०२२ या दिवशी करण्यात आले.

अखंड विठ्ठलभक्तीचा ध्यास असणारे आणि भोळा भाव असणारे पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा ९० वा वाढदिवस ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा !

अखंड विठ्ठलभक्तीचा ध्यास असणारे आणि भोळा भाव असणारे पू. राजाराम भाऊ नरुटे (पू. आबा) यांना ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १६ जुलै २०२२ या दिवशी येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात एका भावसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सनातनचे साधक आणि हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया’वरील ‘पोस्ट’ त्यांच्या वैयक्तिक समजाव्यात !

सनातन संस्था कोणत्याही राजकीय पक्षांसाठी कार्य करत नाही. सनातन संस्था कधीही राजकीय भूमिका मांडत नाही. संस्थेची अधिकृत भूमिका मांडण्याचा अधिकार केवळ सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांना आहे.

सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगाल राज्यांमध्ये विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

हिंदु समाजावर होणारे आघात थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची मागणी केली नाही, तर हिंदूंचे पतन निश्चित आहे. त्यामुळे हिंदु समाजाने हिंदु संघटनांच्या मागे उभे राहून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी झाले पाहिजे, असे मार्गदर्शन ‘भगवा रक्षा वाहिनी’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. आशिष तिवारी यांनी येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.

मध्यप्रदेशमध्ये इंदूर, उज्जैन आणि ग्वाल्हेर येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

उज्जैन येथील गुरुपौर्णिमेमध्ये सनातन संस्थेच्या सौ. स्मिता कुलकर्णी, इंदूर येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम काणे, तर ग्वाल्हेर येथे समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्याचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती अन् धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची आवश्यकता !’, या विषयावर मार्गदर्शन केले.

पुणे जिल्ह्यामध्ये मनमंदिरात भक्तीरूपी ज्योत प्रज्वलित करणारा गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

‘सनातन संस्थे’च्या वतीने १३ जुलै या दिवशी पुणे येथील चिंचवड, कोथरूड, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, जुन्नर, शिरवळ, तळेगाव या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.