मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातन संस्थेचा युवा साधक कु. पार्थ पै याला स्पर्धा परीक्षेत मिळाले सुयश !

मंगळुरू येथील सनातन संस्थेचा युवा साधक कु. पार्थ पै याने कर्नाटकातील विज्ञानशाखेच्या सी.ई.टी. (सामायिक प्रवेश परीक्षा) या स्पर्धा परीक्षेत राज्यात ४६ वा क्रमांक (इंजिनीयरींग विभाग) मिळवला आहे.

वाहनाचा अपघात होऊ नये, यासाठी साधकांनी घ्यावयाची दक्षता आणि प्रवासात अपघात टाळण्यासाठी वापरावयाचे ‘अपघात निवारण यंत्र’ !

सध्या आपत्काळाची तीव्रता आणि अनिष्ट शक्तींची आक्रमणे वाढतच चालली आहेत. त्यामुळे साधकांच्या संदर्भात वाहनाचा अपघात होण्याचा घटना वारंवार घडत आहेत. यासाठी साधकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवतांना पुढीलप्रमाणे आवश्यक ती दक्षता घ्यावी.

सिटी हायस्कूल येथे संस्कृत भाषादिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सनातन संस्थेच्या साधिका सौ. संपदा पाटणकर यांचा विशेष सहभाग !

सिटी हायस्कूल येथे संस्कृत भाषादिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सनातन संस्थेच्या साधिका आणि संस्कृत शिक्षिका सौ. संपदा अमित पाटणकर यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सौ. संपदा अमित पाटणकर यांनी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संस्कृती आणि संस्कार यांचा संस्कृत भाषेशी असलेला संबंध’, यावर मार्गदर्शन केले.

‘निर्भय वॉक’ नव्हे, तर ‘पारदर्शक वॉक’ करत अंनिसने दाभोलकरांना (अंध)श्रद्धांजली वहावी ! – सनातन संस्थेचे अंनिसला आवाहन

‘विवेकाचा जागर’, ‘निर्भय वॉक’, ‘वैज्ञानिक दिन’ आदींच्या गोंडस नावाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) राज्यभरात दाभोलकरांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम करणार आहे. ज्या अंनिसच्या ट्रस्टचे हात आर्थिक घोटाळ्यांमध्ये बरबटले आहेत, ज्यांनी ट्रस्टच्या निधीत पारदर्शकता ठेवलेली नाही, त्यांनी ‘पुरोगामीत्वा’चा आव आणून ‘विवेका’चा जागर करायचा, ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे.

‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या अंतर्गत सनातनच्या आश्रमांमध्ये ध्वजारोहण !

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या म्हणजे ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रशासनाच्या वतीने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवण्यात येत आहे. शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सनातनच्या संस्थेच्या गोव्यातील आश्रमात ध्वजारोहण, तर देवद, पनवेल येथील आश्रमात ध्वजवंदन करण्यात आले.

सनातन संस्थेच्या वतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना बांधली राखी !

भावाचा उत्कर्ष व्हावा अन् भावाने बहिणीचे संरक्षण करावे, या भूमिकेतून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या आर्. टी. नगर येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना राखी बांधण्यात आली.

सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे रक्षाबंधन साजरा करण्यात आला !

भाजपचे आमदार श्री. राम कदम यांना सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी, तर भाजपचे आमदार श्री. मिहिर कोटेचा यांना सनातन संस्थेच्या सौ. वनिता धोत्रे यांनी राखी बांधली.

राखीपौर्णिमेला बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातनचे ग्रंथ देऊन अनोखी ओवाळणी द्या !

राखीपौर्णिमेच्या दिनी आपल्या बहिणीला कपडे, दागिने आदी अशाश्वत भेटवस्तू देण्याऐवजी चिरंतन ज्ञानाचा प्रसार करणा-या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथ भेट देता येतील. सध्याच्या काळानुसार ही भेट देणे अधिक सयुक्तिक ठरेल.

प्रियांका गोस्वामी यांनी पदकाचे श्रेय दिले भगवान श्रीकृष्णाला !

बर्मिंघम (ब्रिटन) येथे चालू असलेल्या ‘राष्ट्रकुल स्पर्धे’मध्ये भारतीय धावपटू प्रियांका गोस्वामी यांनी १० सहस्र मीटर शर्यतीमध्ये रौप्य पदक मिळवले. प्रियांका गोस्वामी यांनी, ‘मी माझ्या यशाचे श्रेय भगवान श्रीकृष्ण आणि माझे कुटुंब यांना देत आहे. त्यांच्याखेरीज मी हे यश प्राप्त करू शकले नसते’, असे म्हटले आहे.

सनातनच्या आश्रमांत सोलापुरी चादरी, प्लेन (नक्षी नसलेल्या) बेडशीट्स आणि टर्किश टॉवेल्स यांची आवश्यकता !

‘संपूर्ण विश्वात अध्यात्मप्रसाराचे आणि मानवजातीच्या उद्धाराचे अविरत कार्य करणार्‍या सनातन संस्थेच्या कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये पूर्णवेळ साधक, हितचिंतक, वाचक, पाहुणे आणि हिंदुत्वनिष्ठ वास्तव्याला येतात अन् आश्रमातील रामराज्य अनुभवण्याचा प्रयत्न करतात…