नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले विविध ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच देवतांची चित्रे आणि नामपट्ट्या समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा !

नवरात्रीच्या काळात देवीची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने करता येऊन भक्तांना देवीतत्त्वाचा लाभ अधिकाधिक व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.

साधकांनो, भवसागरातून तरून जाण्यासाठी प्रतिदिन भावपूर्ण नामजप करून आध्यात्मिक बळ वाढवा !

दिवसेंदिवस आपत्काळाची तीव्रता आणि वातावरणातील रज-तम वाढत आहे. आपत्काळाचा सामना करत भवसागरातून तरून जाण्यासाठी नाम हाच आधार असल्याने साधकांनी प्रतिदिन भावपूर्ण नामजप करून आध्यात्मिक बळ वाढवावे. साधकांनी नामजपाचा आढावा व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या साधकास द्यावा.

श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील अग्रणी आचार्य धर्मेंद्र यांचा देहत्याग

श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील अग्रणी संत आणि हिंदु नेते आचार्य धर्मेंद्र यांनी १९ सप्टेंबर या दिवशी देहत्याग केला. त्यांच्या देहत्यागानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आचार्य धर्मेंद्र आजारी होते.

कौटुंबिक हिंसाचार थांबवण्यासाठी संवादाची आवश्यकता !

समाज विविध समस्यांनी ग्रस्त आहे. अर्थात् कुटुंबापासून समाज बनत असल्याने आज प्रत्येक घरात काही ना काही समस्या असतातच ! या समस्यांचा वेध घेणारा आणि त्यावर उपाय सांगणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात बांधकाम सेवांच्या अंतर्गत सुतारकामाचे कौशल्य असलेल्या कारागिरांची आवश्यकता !

आश्रमात रहाणाऱ्या साधकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सध्या नवीन वास्तूचे बांधकाम करण्याची सेवा चालू आहे. या वास्तू उभारणीच्या कार्यासाठी सुतारकामाचे कौशल्य असलेल्या कारागिरांची आवश्यकता आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धान्य निवडण्याच्या सेवेसाठी साधकांची आवश्यकता !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या चैतन्यदायी आश्रमात सेवेची अमूल्य संधी !

साधू-संतांसाठी असुरक्षित महाराष्ट्र !

ज्ञानोबा-तुकोबा यांचा वारसा असणारा, वारकर्‍यांच्या दिंड्या-पताका यांनी दुमदुमणारा, भजन-कीर्तनात दंग होणारा, गणेशोत्सवात लगबगून जाणारा, प्रदीर्घ संतपरंपरेचा वारसा असणारा महाराष्ट्र साधू-संतांसाठी असुरक्षित ठरतो कि काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे. पालघर, नांदेड येथील घटनांनंतर नुकत्याच सांगली जिल्ह्यातील लवंगा येथे साधूंना झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे देशात महाराष्ट्राची अपकीर्ती होत असून अशा प्रकारांना वेळीच आळा न घातल्यास यापुढील … Read more

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात करावयाचा दत्ताचा सुधारित नामजप !

‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन करावयाचा सुधारित नामजप ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ असा आहे. हा नव्याने ध्वनीमुद्रित केलेला नामजप सनातन संस्थेच्या sanatan.org या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

सनातनच्या वाढत्या कार्यात बांधकाम क्षेत्रातील सेवांसाठी स्थापत्य अभियंत्यांची आवश्यकता !

सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ राहून मनुष्यजन्माचे सार्थक करण्याच्या ध्येयाने प्रेरित होणार्‍या साधकांची संख्या वाढत आहे. साधकांची वाढती संख्या पहाता सध्याची आश्रमाची वास्तू अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन वास्तूच्या निर्मितीसाठी स्थापत्य अभियंत्यांची (‘सिव्हिल इंजिनीयर’ची) आवश्यकता आहे.

श्री. सुधाकर जकाते यांचा ८९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने हृद्य सत्कार !

श्री. सुधाकर जकाते लष्करात मोठ्या पदावर कार्यरत होते. ९० व्या वर्षात पदार्पण करूनही ते माजी सैनिकांचे अध्यक्ष, जिल्हा ग्राहक मंचाचे मार्गदर्शक आणि रुद्राभिषेक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सेवा करतात. ‘‘आता या सर्व व्यापातून सुटून केवळ भगवंताच्या दर्शनाची ओढ लागली आहे’’, असे त्यांनी शेवटी सांगितले.