२५.१०.२०२२ या दिवशी दिसणारे खंडग्रास सूर्यग्रहण, ग्रहणाच्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि ग्रहणाचे राशीपरत्वे मिळणारे फल !

‘आश्विन अमावास्या (२५.१०.२०२२, मंगळवार) या दिवशी भारतासह आशिया खंडाचा मध्य आणि पश्चिमेकडील प्रदेश, संपूर्ण युरोप खंड, आफ्रिका खंडाचा पूर्वाेत्तर प्रदेश या प्रदेशांत ग्रहण दिसेल.

युरोपात युद्धाचे ढग गडद !

युक्रेनने क्रिमियातील कर्च पूल पाडल्याचा सूड उगवण्यासाठी रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह तेथील १० शहरांवर आक्रमण केले, अशी माहिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली. रशियाने कीववर क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे सहस्रो नागरिकांना छावण्या आणि भूमीगत मेट्रोस्थानके येथे आश्रय घ्यावा लागला.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष प.पू. स्वामी सागरानंद महाराज यांचा देहत्याग !

नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी प.पू. महाराजांकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना वेळोवेळी मार्गदर्शन अन् त्यांचा आशीर्वादही लाभले. त्यांनी वेळोवेळी सनातन आणि समिती यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांची सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते यांच्यावर विशेष प्रीती होती.

‘हर घर भगवा’ या मोहिमेअंतर्गत रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात भगव्या ध्वजाचे पूजन !

हिंदु जनजागृती समितीच्या २० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने देशभरात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ साजरे केले जात आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज बुलंद करण्यासाठी समितीने ३ ऑक्टोबरपासून ‘हर घर भगवा’ या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला.

गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानातील पालखी आणि भाविकांचे सनातनच्या वतीने स्वागत !

रामनाथी (फोंडा) येथील श्री रामनाथ देवस्थानात आश्विन शुक्ल दशमी या दिवशी ५ ऑक्टोबरला सीमोल्लंघन कार्यक्रम आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

भाऊबिजेनिमित्त सर्वत्रच्या हिंदु बांधवांना आवाहन !

भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातन संस्थेचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !

धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

सर्व वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती ! धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील !

२४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !

आतापर्यंत अमेरिकेत आलेल्या चक्रीवादळांपैकी ‘इयान’ चक्रीवादळ हे सर्वांत शक्तीशाली असल्याचे सांगण्यात येत आहे. वादळामुळे संपूर्ण फ्लोरिडा, जॉर्जिया आणि दक्षिण कॅरोलिना या दक्षिण-पूर्व राज्यांमध्ये लाखो लोक पूरग्रस्त होण्याची शक्यता आहे.

‘पीएफआय’वर बंदी हा अंतर्गत आतंकवादावर ‘सर्जिकल स्ट्राइक’ ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्थेने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘पी.एफ्.आय.’वरील बंदी, ही ‘गझवा-ए-हिंद’ अर्थात् भारताला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्याची स्वप्ने बाळगणा-या जिहादी प्रवृत्तींना चपराक आहे.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. जीजी यांच्या (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) यांच्या अस्थींचे नर्मदा नदीमध्ये विसर्जन

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) धर्मपत्नी आणि पू. नंदू कसरेकर यांच्या मातोश्री प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) (वय ८६ वर्षे) यांनी १८ सप्टेंबर या दिवशी दुपारी २ वाजता नाशिक येथे त्यांचे धाकटे सुपुत्र श्री. रवींद्र कसरेकर यांच्या घरी देहत्याग केला.