सनातनच्या आश्रमांत, तसेच धर्मप्रसाराच्या सेवांसाठी वाहन-चालकांची आवश्यकता !

सनातनचे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य दिवसेंदिवस विस्तारत आहे. या कार्याचा आवाका पुष्कळ वाढल्याने वाहन चालवू शकणार्‍यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे सनातनच्या आश्रमांत, तसेच प्रसाराच्या सेवांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहन-चालकांची तातडीने आवश्यकता आहे.

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सनातन संस्थेच्या साधिकेचा प्रथम क्रमांक !

या वेळी सनातनच्या साधिका सौ. चैत्राली शुभम वडणगेकर म्हणाल्या, ‘‘निबंध स्पर्धेच्या पूर्वसिद्धतेसाठी मी सनातन संस्थेचा ‘आईचे दूध : भूलोकातील अमृत’ या ग्रंथाचा अभ्यास केला. या ग्रंथामधून अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.’’

रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

२१.७.२०२१ पासून महाड शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने सावित्री, गांधारी अन् इतर नद्यांना महापूर येऊन पाणी महाड शहरामध्ये शिरले. त्यामुळे महाड शहरामध्ये जवळजवळ २० ते २५ फूट पाणी भरले आणि शहर दोन दिवस पाण्याखाली होते.

सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांचा देहत्याग

नम्रता, निरपेक्ष प्रीती यांसारखे अनेक दैवी गुण असलेले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्य भाव असलेले, तसेच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांनी ३० ऑक्टोबर २०२२ ला दुपारी ४.२७ वाजता दीर्घ आजारामुळे देहत्याग केला.

‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका

‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशमध्ये किमान २४ जणांचा मृत्यू झाला असून वादळापासून बचाव करण्यासाठी देशातील १५ जिल्ह्यांतील २ लाख १९ सहस्रांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केले लक्ष्मी-कुबेर पूजन !

सर्व साधकांवर श्री महालक्ष्मी देवीची कृपा रहावी, अलक्ष्मीचा (निर्धनतेचा) परिहार व्हावा आणि धर्मकार्यासाठी समृद्धता यावी, यासाठी सप्तर्षी जीवनाडीच्या आज्ञेने २४.१०.२०२२ (दीपावली आणि लक्ष्मीपूजन) या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन केले.

२५.१०.२०२२ या दिवशी दिसणारे खंडग्रास सूर्यग्रहण, ग्रहणाच्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि ग्रहणाचे राशीपरत्वे मिळणारे फल !

‘आश्विन अमावास्या (२५.१०.२०२२, मंगळवार) या दिवशी भारतासह आशिया खंडाचा मध्य आणि पश्चिमेकडील प्रदेश, संपूर्ण युरोप खंड, आफ्रिका खंडाचा पूर्वाेत्तर प्रदेश या प्रदेशांत ग्रहण दिसेल.

युरोपात युद्धाचे ढग गडद !

युक्रेनने क्रिमियातील कर्च पूल पाडल्याचा सूड उगवण्यासाठी रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह तेथील १० शहरांवर आक्रमण केले, अशी माहिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली. रशियाने कीववर क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे सहस्रो नागरिकांना छावण्या आणि भूमीगत मेट्रोस्थानके येथे आश्रय घ्यावा लागला.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष प.पू. स्वामी सागरानंद महाराज यांचा देहत्याग !

नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी प.पू. महाराजांकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना वेळोवेळी मार्गदर्शन अन् त्यांचा आशीर्वादही लाभले. त्यांनी वेळोवेळी सनातन आणि समिती यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांची सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते यांच्यावर विशेष प्रीती होती.

‘हर घर भगवा’ या मोहिमेअंतर्गत रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात भगव्या ध्वजाचे पूजन !

हिंदु जनजागृती समितीच्या २० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने देशभरात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ साजरे केले जात आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज बुलंद करण्यासाठी समितीने ३ ऑक्टोबरपासून ‘हर घर भगवा’ या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला.