हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग !’
सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात फाल्गुन कृष्ण दशमी, म्हणजेच १७ मार्च या दिवशी भगवान शिवाचे गुरुरूप असलेल्या श्री दक्षिणामूर्ति या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.