उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून सांगितलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये

श्री. जयतीर्थ आचार्या हे उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी आहेत. ‘राघवेंद्र स्वामी उडुपी मठा’चे ते व्यवस्थापक आहेत. वर्ष १९९६ पासून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते ज्योतिष विषयाचा अभ्यास करत आहेत. ९.४.२०२३ या दिवशी श्री. जयतीर्थ यांची मी भेट घेतली.

अध्यात्माच्या संदर्भातील लिखाण किंवा लेख असणारी नियतकालिके असल्यास ती कृपया सनातनला पाठवा !

सनातनने आतापर्यंत गुरुकृपायोगाच्या अंतर्गत विविध साधनामार्गांची ओळख करून देणारे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. आगामी काळात अध्यात्म आणि विविध साधनामार्ग यांची अधिक सविस्तर माहिती जिज्ञासूंना देता यावी, यासाठी त्या संदर्भातील लिखाणाचे संकलन करणे चालू आहे. यासंदर्भात लेख असणारे दैनिक, पाक्षिक, मासिक यांसारखी नियतकालिके कुणाकडे असल्यास त्यांनी ती पुढील पत्त्यावर पाठवावी.

मूळ संभाजीनगर येथील आणि आता गोव्‍यात वास्‍तव्‍यास असलेले श्री. सत्‍यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) सनातनच्‍या १२४ व्‍या संतपदी विराजमान !

पू. सत्‍यनारायण तिवारी हे गेल्‍या २ वर्षांपासून तीव्र शारीरिक त्रासांमुळे रुग्‍णाईत असल्‍यामुळे त्‍यांना सतत झोपून रहावे लागते, तसेच त्‍यांना मेंदूच्‍या आजारामुळे विस्‍मृतीही होते. अशा स्‍थितीतही त्‍यांनी आंतरिक साधनेच्‍या बळावर सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या कृपेने संतपद गाठले. फोंडा येथील त्‍यांच्‍या निवासस्‍थानी हा संतसन्‍मान सोहळा पार पडला.

तुंग (जिल्हा सांगली) येथील मुख्याध्यापिका आणि सनातनच्या साधिका सौ. पौर्णिमा गडकरी यांच्या लिखाणाला ‘सर्वाेत्तम लेख’ म्हणून राज्यात प्रथम क्रमांकाने सन्मान !

राज्यस्तरीय शिक्षकांसाठीच्या स्पर्धेत मुख्याध्यापिका सौ. पौर्णिमा गडकरी यांनी ‘शाळेमध्ये लहान मुलांशी आदर्श संवाद कसा साधला जावा ?’, या विषयावर लिखाण केले होते.

मिरज येथे श्री संत वेणास्वामी पुण्यस्मरण महोत्सवाची सांगता करतांना सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सव निमित्त साकडे !

या प्रसंगी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त समर्थभक्त श्री. मिलिंद कुलकर्णी यांनी साकडे घातले, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा सर्वांकडून म्हणून घेतली.

उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !

श्री. जयतीर्थ आचार्या हे उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी आहेत. वर्ष १९९६ पासून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते ज्योतिष विषयाचा अभ्यास करत आहेत. त्यांनी आगामी भीषण काळाच्या संदर्भात वर्तवलेली भविष्यवाणी पुढे देत आहे.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त श्री महालक्ष्मी मंदिरात साकडे !

कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर, शाहूवाडी, गडहिंग्लज, निगवे, भुयेवाडी, हुपरी यांसह अन्य गावांमध्येही ५० हून अधिक देवालयांमध्ये साकडे घालण्यात आले. जन्मोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध भागातील मंदिराची स्वच्छताही करण्यात येत आहे. आतापर्यंत ३३ हून अधिक मंदिरांमध्ये स्वच्छता करण्यात आली आहे.

२० एप्रिलला होणारे सूर्य-ग्रहण भारतात दिसणार नाही !

या वर्षीचे २० एप्रिल या दिवशी पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळही मानण्याची आवश्यकता नसणार आहे.

धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी जन्माष्टमी महोत्सव निमित्त सनातन संस्थेच्या साधकांनी त्यांचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले ! !

आपण देव, देश आणि धर्म यांसाठी केलेल्या कार्यानेच सद्गुरु संतुष्ट होतात. आपल्या मुलांना शिक्षण देण्याबरोबर देव, देश आणि धर्म यांचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. आपली पुढची पिढी राष्ट्रभिमानी निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

सनातन संस्थेच्या वतीने अयोध्येतील भव्य श्रीराममंदिरातील मूर्तीसाठी आणलेल्या शाळीग्राम शिळेचे भावपूर्ण पूजन !

अयोध्येत भव्य श्रीराममंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिरात साडेपाच फूट उंचीची उभ्या मुद्रेतील श्रीरामाची मूर्ती असणार आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी लागणारी शाळीग्राम शिळा नेपाळ येथील गंडकी नदीतून आणण्यात आली.