हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन हाच पर्यावरण रक्षणाचा उपाय
प्रतिवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी या दिवशी जागृती केली जाते. यामध्ये पर्यावरणाचा र्हास रोखण्याचा संदेश दिला जातो; पण असा दिवस साजरा करण्याने खरेच पर्यावरणाचे रक्षण होणार का ? याचा सूक्ष्म विचार पर्यावरणप्रेमींनी करावा. खर्या अर्थाने पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हिंदु धर्माचे पुनरुज्जीवन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.