कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाचे धक्के
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या परिसरात ३ जूनला रात्री ११ वाजून ४४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.८ इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू धरण परिसरातील भूमीपासून १० किलोमीटर इतक्या खोलीवर होता.