ईश्वराप्रती उत्कट भाव आणि तमिळनाडूतील हिंदुत्वनिष्ठांचा आधारस्तंभ असलेल्या चेन्नई येथील साधिका सौ. उमा रविचंद्रन् सनातनच्या ७० व्या समष्टी संतपदी विराजमान !
श्रीनिवास अवताराचा जन्म झाल्याने पुरट्टासी महिन्याला विशेष मानले जाते. अशा शुभदिनी श्रीकृष्णाप्रती उत्कट भाव असलेल्या चेन्नई येथील सनातनच्या साधिका सौ. उमा रविचंद्रन् यांनी ७१ टक्के पातळी गाठली असून त्या सनातनच्या सुवर्णमय इतिहासात ७० व्या समष्टी संत म्हणून विराजमान झाल्याची आनंददायी घोषणा करण्यात आली.