देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात प.पू. पांडे महाराज यांचा ९० व्या वाढदिवसाचा सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती उत्कट भाव असणारे आणि सनातनच्या साधकांवर भरभरून प्रीती करणारे एकमेवाद्वितीय प.पू. पांडे महाराज ! प.पू. पांडे महाराज यांचा ९० वा वाढदिवस म्हणजेच त्यांचा आत्मगौरव सोहळा देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात साजरा झाला.