प्रखर धर्मनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह यांचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन !

प्रखर धर्मनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ५ एप्रिल या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले. साध्वीजींचे रामनाथी आश्रमात शुभागमन झाल्यावर सौ. आरती पुराणिक यांनी त्यांचे पाद्यपूजन आणि औक्षण केले.

सोलापूर येथील ज्ञानप्रबोधन विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेकडून सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक !

सोलापूर येथील मासाळनगर, विजापूर रस्ता, ज्ञानप्रबोधन शाळेत हळदी-कुंकू कार्यक्रम नुकताच पार पडला.या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या सौ. सुधा घाटगे यांना निमंत्रित करण्यात आले होते.

साधकांनो, संकटकाळात आपले आणि समष्टीचे रक्षण होण्यासाठी देवाकडे भक्ती, बुद्धी आणि शक्ती मागा !

स्थुलातील संकटकाळात कार्य करतांना सूक्ष्म आणि स्थूल या दोन्ही स्तरांच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आध्यात्मिक शक्तीसह मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक या स्तरांवरील शक्तींचीही आवश्यकता असते. यामुळे प्रतीदिन साधकांनी देवाला प्रार्थना करतांना भक्ती, बुद्धी आणि शक्ती यांची मागणी करणे आवश्यक आहे.

भारतात २०० वर्षांपूर्वी डोळ्यांची शस्त्रक्रिया !

प्राप्त झालेल्या नोंदींनुसार राजा सरफोजी ‘धन्वंतरी महल’ नावाचे डोळ्यांचे चिकित्सालय चालवत होते. राजा सरफोजी यांना नेत्ररोगांचा विशेषज्ञ म्हणून लोक ओळखत असत. एक इंग्रजी वैद्य मैक्बीन हे त्यांचे सहकारी म्हणून काम पहात होते.

जयपूर येथील पखवाज (मृदंग) वादक छवी जोशी यांच्या पखवाजवादनाच्या वेळी त्यांना स्वतःला आणि साधकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या दैवी अनुभूती !

श्री. छवी जोशी हे १५ वर्षांपासून पखवाजवादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहेत. त्यांनी पखवाजाचे प्रारंभिक शिक्षण पं. बद्रीनारायण मृदंगाचार्य यांच्याकडून घेतले. आजपर्यंत त्यांनी जवाहर कला केंद्राच्या माध्यमातून अनेक नामवंत कलाकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले असून अनेक कलाकारांना पखवाजाची साथही केली आहे.

उज्जैन येथील ‘शैव महोत्सवा’त लावण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट !

उज्जैन येथील ‘शैव महोत्सवा’त लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अमित शहा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री श्री. शिवराज सिंह चौहान, तसेच रा.स्व. संघाचे सहकार्यवाह श्री. भय्याजी जोशी यांनी ५ जानेवारीला भेट दिली.

राष्ट्रीय गोसेवा परिषदेत सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या प्रदर्शनाला केंद्रीय कृषीराज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी भेट दिली !

सनातन संस्थेच्या वतीनेही आयुर्वेदिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांचा कक्ष लावण्यात आला होता. याला केंद्रीयकृषी राज्यमंत्री श्री. पुरुषोत्तम रुपाला यांनी भेट दिली. ‘आपले कार्य चांगले आहे. आयुर्वेद प्रत्येक घरात जाणे आवश्यक आहे’, असा अभिप्राय त्यांनी दिला.

भावी संकटकाळाची सिद्धता म्हणून स्वतःच्या घराभोवती औषधी वनस्पतींची लागवड करा !

‘भावी भीषण संकटकाळामध्ये औषधांचा तुटवडा भासेल. त्यासाठी आतापासूनच औषधी वनस्पतींची लागवड करायला हवी. वनस्पतींची लागवड केल्यावर त्या वाढून वापरण्याजोग्या होईपर्यंत काही कालावधी जावा लागतो. घरगुती औषधे बनवून ती वापरणे शिकून घ्यावे लागते.

अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींचेच ग्रंथ चैतन्यदायी असतात, हे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाद्वारे केलेल्या संशोधनातून स्पष्ट

लेखकाची आध्यात्मिक पातळी आणि आध्यात्मिक स्थिती यांचा त्याच्या वाङ्मयावर होणारा परिणाम, या विषयावर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले लिखित शोधनिबंध धर्म, साहित्य आणि संस्कृती या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला.

वर्ष २०१८ मध्ये तिसरे महायुद्ध होईल ! – जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्टॅ्रडॉमसचे भाकीत

नॉस्ट्रॅडॉमस यांनी कवितेच्या साहाय्याने सांगितलेली अनेक भाकिते खरी ठरली आहेत. त्यांनी वर्ष २०१८ साठीचेही भाकीत केलेले आहे. या भाकितानुसार  वर्ष २०१८ मध्ये तिसरे महायुद्ध होणार आहे.